मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  maha budget session: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी?; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केली भूमिका

maha budget session: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी?; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केली भूमिका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 27, 2023 03:10 PM IST

Marathi Bhasha Classical status issue in Budget Session : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

Vidhan Bhavan Marathi
Vidhan Bhavan Marathi

Marathi Bhasha Classical status issue in Budget Session : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. मराठी भाषा गौरव दिनी सुरू झालेल्या या अधिवेशनात सुरुवातीलाच मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर राज्य सरकारनं आपली भूमिका मांडली.

ट्रेंडिंग न्यूज

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, असा औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या १४ वर्षांपासून सातत्यानं केंद्र सरकारकडं पाठपुरावा करण्यात येत आहे. साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे १५०० ते २ हजार वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचं मूळ स्वरूप व आजचं स्वरूप यांचं नातं असणं हे अभिजात भाषेचे चारही निकष मराठी भाषेनं पूर्ण केलेले आहेत. मात्र अद्यापही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा प्रश्न रखडलेला असल्याचं छगन भुजबळ यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर उत्तर दिलं. 'सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा ही मागणी अनेक वर्षे जुनी आहे. वेगवेगळ्या सरकारांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला आहे. केंद्रानं आजपर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया या सहा भाषांना हा दर्जा दिला आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकारनं ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीनं जवळपास ५०० पानी अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप यावर काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही.

IPL_Entry_Point