मराठी बातम्या  /  धर्म  /  Marathi Bhasha Gaurav Din : पेशवा, सतरंजी, बटाटा, सामना... हे शब्द मूळचे मराठी नाहीत! यादीच बघा!

Marathi Bhasha Gaurav Din : पेशवा, सतरंजी, बटाटा, सामना... हे शब्द मूळचे मराठी नाहीत! यादीच बघा!

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Feb 27, 2023 12:29 PM IST

Facts About Marathi Language : मराठीत असे अनेक शब्द आहेत जे मूळ इतर भाषांमधले आहेत. मात्र हे शब्द मराठीत इतके चपखल बसलेत की आज आपण त्या शब्दांचा अगदी सर्रास वापर करतो.

मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन (हिंदुस्तान टाइम्स)

आज मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करत आहोत. आज मराठीचे गोडवे गायले जाणार. अमृताहून गोड माय मराठी कशी आहे याचं महत्व सांगितलं जाणार. मात्र हे सारं करत असतानाच आपल्या मराठीत असे अनेक शब्द आहेत जे मूळ इतर भाषांमधले आहेत. मात्र हे शब्द मराठीत इतके चपखल बसलेत की आज आपण त्या शब्दांचा अगदी सर्रास वापर करतो. हे शब्द मूळचे मराठी नाहीत हे आपल्या लेखीही नसतं. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त असेच काही शब्द ज्यांची मूळ भाषा वेगळी आहे मात्र मराठीत ते शब्द बेमालूमपणे वापरले जातात, त्यांची माहिती घेऊया.

 

फारशी भाषेतून मराठीत आलेले शब्द

मादी, दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा,पोशाख, पेशवा, सामना, अप्रूप, लष्कर, बाग, बगीचा, मशीद, महिना, मोहोर, रसद, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, अबकारी, कारभार, चाबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब

 

अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द

रयत, अर्ज, उर्फ, इनाम, जाहीर, मंजूर, बातमी, खर्च, हुकुम, मेहनत, खजिल, कलम, सरबत, फाजील, उस्ताद, शान, जाहीरनामा, साफ, संदुक, नजाकत, तैनात, तालुका, तालीम, तबला, तफावत, जकात, वायदा, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर,दौलत

 

पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द

बटाटा,तंबाखी, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्कीट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, लवाद, वरांडा, फालतू, मेज, पिंप, साबण, बुच, परात, घमेले, काडतूस, बटवा, फीत, शिरपेच, चावी, तुरूंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तुल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी

 

गुजराती भाषेतून मराठीत आलेले शब्द

दादर, डबा, भिशी, हरताळ, जेमतेम, खादी, मेहनत, गरबा, चरखा, सदरा, मथळा, लागवड, पथारी, मावा, ढोकळा, आवकजावक, मलमपट्टी, दामदुप्पट, अफरातफर, पिश्च्च, झंझट

 

तेलगू भाषेतून मराठीत आलेले शब्द

डबी, टाळे, जाडी, तूप, गदारोळ, अनारसा,

 

उर्दू भाषेतून मराठीत आलेले शब्द

बत्ती, बदली, बढती, खुद्दार

 

कानडी भाषेतून मराठीत आलेले शब्द

आक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकीत्ता, खलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, पेटी, परडी, शिंपी, चाकरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंधी, खोली, कोथिंबीर, मिरवणूक, छटाक, झुरळ, पगडी, चड्डी, चिरगुट, मुंडासे,

WhatsApp channel

विभाग