मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Andolan : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रॅपिड ॲक्शन फोर्स, CISF, ITBP आणि SRPF चा तगडा बंदोबस्त

Maratha Andolan : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रॅपिड ॲक्शन फोर्स, CISF, ITBP आणि SRPF चा तगडा बंदोबस्त

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 26, 2024 06:44 PM IST

Police security in Navi mumbai : नवी मुंबईतील मराठा मोर्चाच्या बंदोबस्तासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या सात तुकड्या,केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल,इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या नवी मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत.

Police security in Navi mumbai
Police security in Navi mumbai

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील मराठा समाज मुंबईकडे निघाला असून. आज लाखोंच्या संख्येने असलेला मराठा जनसमुदाय मुंबईच्या वेशीवर  वाशीमध्ये थांबला आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर जमलेल्या लाखोच्या जनसमुदायाने मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यता  आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

यापार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून रॅपिड ॲक्शन फोर्स नवी मुंबईत दाखल झाले आहे. तसेच मुंबई पोलीसांनी  चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवी मुंबईतील मराठा मोर्चाच्या बंदोबस्तासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या सात तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या नवी मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत.

रॅपिड ॲक्शन फोर्सची टीम वाशीमध्ये दाखल झाली आहे. या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल तसेच स्थानिक वाहतूक पोलीस नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसही सज्ज  झाले आहेत. मराठा आंदोलक वाशीहून आझाद मैदानाकडे निघाल्यास पोलिसांनी चेंबूर ते आझाद मैदान मार्गाची पाहणी केली आहे. वाशी ते चेंबूर पर्यंत एक मार्ग असून चेंबूरहून दोन मार्गे आझाद मैदानाकडे जातात. यात एक ईस्टर्न फ्री वे आणि दुसरा चुनाभट्टी सायन सिटी मार्ग हा आहे. 

IPL_Entry_Point