मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी सुस्साट! लोकसभेचं जागावाटप झालं, कुणाला किती जागा? पाहा!

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी सुस्साट! लोकसभेचं जागावाटप झालं, कुणाला किती जागा? पाहा!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 16, 2023 09:58 AM IST

Maha Vikas Aghadi Lok Sabha Election 2024 Seat Sharing Formula : राज्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली असून लोकसभा निवडणुकीच्या जागांचा फॉर्मुला ठरला आहे.

 mahavikas aghadi formula
mahavikas aghadi formula (HT_PRINT)

Maha Vikas Aghadi Lok Sabha Seat Sharing Formula : राज्यात सत्ता गमवावी लागलेली महाविकास आघाडी अधिक मजबुतीनं एकत्र आली असून लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्मुला देखील ठरला आहे. लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांमध्ये झालं आहे. अन्य छोट्या पक्षांना लोकसभेची एकही जागा सोडण्यात आलेली नाही. घटक पक्षांना तिन्ही पक्ष आपापल्या कोट्यातून जागा सोडण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. जागावाटप ठरवतानाच कार्यकर्त्यांच्या पातळीवर मनोमिलनासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. कोण किती जागा लढवणार या बाबतचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. या फॉर्मुल्यानुसार शिवसेना सर्वाधिक २१ जागा लढवणार आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस १९ तर, काँग्रेस ८ जागा लढणार आहे. वाटप झालेल्या ४८ पैकी ४ ते ५ जागांबाबत अजूनही काही प्रमाणात मतभेद असल्यानं त्यावर पुन्हा चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी चांगले यश मिळाले. एकत्रीत लढल्यामुळे हे शक्य झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढण्याचे तिन्ही पक्षाचे ठरले असून जागावाटप देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यानुसार मुंबई आणि उपनगरमधील लोकसभेच्या ६ जागांपैकी शिवसेनेला ४ तर उरलेल्या २ जागांपैकी १ राष्ट्रवादीला तर दुसरी काँग्रेसला दिली जाणार आहे. काँग्रेसने उत्तर मुंबई, तर राष्टवादी काँग्रसने ईशान्य मुंबई लढवावी हे देखील ठरल्याचे वृत्त आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार, राष्ट्रवादीचे ४, तर काँग्रेसचा केवळ १ खासदार निवडून आला होता. त्यामुळे हाच फॉर्म्युला जागा वाटपासाठी ठेवण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेनेला २१, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने १९, तर काँग्रेसने ८ जागा लढविण्याबाबतच चर्चा झाली. या जागावाटपाबाबत कोणत्याही पक्षाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नसला, तरी जागावाटपाच्या बैठकीत ठरलेल्या आकड्यांबाबत घटक पक्षांमध्ये मतभेद झाले नसल्याचे समजते.

IPL_Entry_Point

विभाग