मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  US News: अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची निवड

US News: अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची निवड

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 16, 2023 09:30 AM IST

US News : अमेरिकेच्या संसदेच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशांच्या नागरिकांचा वरचश्मा दिसून येत आहे. आणखी एका भारतीय नागरिकाची महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.

रवी चौधरी
रवी चौधरी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशांच्या नागरिकांचा वरचश्मा दिसून येत आहे. आणखी एका भारतीय वंशाच्या नागरिकांची अमेरिकेच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पदावर वर्णी लागली आहे. भारतीय वंशांचे रवी चौधरी असे या भारतीयाचे नाव असून अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील संरक्षण उपमंत्रीपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. ते अमेरिकेच्या वायु दलाची जबाबदारी सांभाळणार आहेत. पेंटागनमधील सर्वोच्च पदांपैकी हे एक पद आहे.

रवी चौधरी यांनी अमेरिकेच्या वायु दलात मोठी जबाबदारी सांभाळली आहे. ते अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी राहिले आहेत. या सोबतच एरोस्पेस आणि संरक्षण तज्ज्ञ म्हणून यापूर्वी त्यांनी अमेरिकन हवाई दलात उच्च पदांची जबाबदारी सांभाळली आहे. ते हवाई दलात वैमानिक असून १९९३ ते २०१५ या काळात ते अमेरिकेच्या वायुदलाचे सक्रिय सदस्य होते. या कालावधीत त्यांनी अनेक मोहिमांमद्धे सहभाग घेतला. त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी ऑपरेशन आणि फंक्शनल अशा अमेरिकन वायु दलाच्या दोन्ही विभागात काम केले आहे. त्यांनी जगातील सर्वात मोठे लष्करी वाहतूक विमान असलेले सी-१७ या विमानाचे देखील ते वैमानिक राहिले आहेत.

चौधरी यांनी अफगाणिस्तान आणि इराक युद्धात सहभाग नोंदवला आहे. या युद्धातील अनेक महत्वाच्या मोहीमात्यांनी फत्ते केल्या आहेत. यानंतर ते इराकमध्ये बरेच कार्यरत होते. चौधरी हे एविएशन इंजिनिअर आहेत. अमेरिकेच्या हवाई दलाला आधुनिक तंत्रज्ञात देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात ते प्रेसिडेंट अॅडव्हाजरी कमिशनचे सदस्य होते.

अमेरिकेच्या संरक्षणाची जबाबदारी ही पेंटागनवर आहे. येथून सर्व जगावर लक्ष ठेवले जाते. अनेक महत्वाच्या मोहीमा त्यांची आखणी या ठिकाणीच केली जाते. अशा या पेंटागनमध्ये संरक्षण उपमंत्री म्हणून महत्वाची भूमिका असते. आता ही भूमिका भारतीय वंशांचे रवी चौधरी सांभाळणार असून त्यांच्या कडे अमेरिकेच्या वायुदलाची जबाबदारी राहणार आहे. अमेरिकेचे वायुदल जगातील पहिल्या क्रमांकाचे वायुदल आहे.

IPL_Entry_Point

विभाग