मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC Paper Leak : बारावी पेपरफुटीचं प्रकरण गणितापुरतं मर्यादित नाही! आणखी दोन विषयांचे पेपर फुटले

HSC Paper Leak : बारावी पेपरफुटीचं प्रकरण गणितापुरतं मर्यादित नाही! आणखी दोन विषयांचे पेपर फुटले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 16, 2023 09:46 AM IST

HSC Paper Leak : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. फक्त गणितच नव्हे तर इतर दोन विषयांचेही पेपर फुटले असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात आढळले आहे.

Exam
Exam

मुंबई : दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत नगर येथील एका महाविद्यालयाच्या केंद्रावर गणिताचा पेपर फुटला होता. तब्बल ११९ मुलांकडे हा पेपर पोहचला होता. शाळेचा निकाल १०० टक्के लवण्यासाठी हा पेपर फोडण्यात आल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात पुढे आले आहे. दरम्यान, तपासात आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केवळ गणिताचा नव्हे तर आणखी दोन पेपर फुटल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

दहावी आणि बारावीच्या पेपर फुटल्या प्रकरणी मुंबईक्राइम ब्रांचतर्फे तपास सुरू आहे. नगर येथील एका महविद्यालयाच्या केंद्रावरून गणिताच्या पेपर फुटला होता. मात्र, या सोबतच आणखी दोन पेपर फुटल्याचे तपासात पुढे आले आहे. गणितासोबत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर फुटले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आणखी किती पेपर फुटले या या बाबत शंका निर्माण झाली आहे.

३ मार्चला गणिताचा पेपर होता. तर त्या आधी २७ फेब्रुवारीला भौतिकशस्त्र आणि १ मार्चला रसायन शास्त्राचा पेपर फुटला होता. परीक्षेच्या एक तासापूर्वी व्हॉट्सअॅपद्वारे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पेपर शेअर करण्यात आल्याचे पुरावे सापडले आहे.

अहमदनगरमधील मातोश्री भागुबाई भांबरा कृषी व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील व्यवस्थापन कर्मचारी आणि शिक्षकांचे मोबाईल गुन्हे शाखेने जप्त केले. त्यांच्या मोबाइलचा व्हॉट्सअॅप डेटा तपास अधिकाऱ्यांनी मिळवला असून त्यातून आणखी दोन पेपर फुटल्याची मानीती उघड झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पर्यन्त अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

३ मार्च रोजी बारावीच्या गणिताचा पेपर होता. हा पेपर ३ तास आधीच लिक झाला होता. पेपर सुरू होण्याच्या एक तास आधी समाज माध्यमातून हा पेपर तब्बल ११९ मुलांना देण्यात आला. या साठी त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेण्यात आले. अहमदनगरच्या विद्यालय सेंटरमध्ये त्यांच्याच विद्यालयाचे तब्बल ११९ मुले आल्याने त्यांच्या विद्यालयाचा निकाल हा १०० टक्के लागावा या हेतूनं हा पेपर फोडण्यात आला. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून गणीतचा पेपर हा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून लिक करण्यात आला.

IPL_Entry_Point

विभाग