Crime news : पुण्यातील तरुणीवर अमेरिकेत धर्मांतरासाठी दबाव; पोलिसांनी केली सुटका
Crime news : एका तरुणीचा प्रेमविवाह झाल्यावर ती अमेरकीत पतीसह गेली. या ठिकाणी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला असून तिचा छळ करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
े : पुण्यातील एका तरुणीचे एका सोबत प्रेमविवाह झाल्यावर ती तरुणी पतीसह अमेरिकेत वास्तव्यास गेली. मात्र, त्या ठिकाणी धर्मांतर करण्यासाठी तरुणीवर दबाव टाकण्यात येऊ लागला. या छळाला कंटाळून तिने अमेरिकन पोलिसांची मदत घेतली. या प्रकारातून तेथील पोलिसांनी या तरुणीची सुटका केली. या तरुणीने पुण्यात आल्यानंतर तिने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, असून धर्मांतरासाठी दबाब आणि शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तरुणीच्या पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती लव अरुण वर्मा, दीर कुश अरुण वर्मा, परवीन अरुण वर्मा, विधू वर्मा, डॅनियल वर्मा आणि अरुण वर्मा (सर्व रा. खारघर, मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तरुणीच्या छळ हा नवी मुंबईतील खारघर, तसेच अमेरिकेत १ डिसेबर २०२२ पासून सुरू होता. डेक्कन पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी नवी मुंबईतील खारघर पोलिसांकडे दिले आहे.
या घटनेची हकिगत अशी की, तक्रारदार तरुणी ही पुण्यातील विधी महाविद्यालय मार्गावरील रस्त्यावरील एका सोसायटीत राहते. तिचा विवाह गेल्या वर्षी लव शर्मा याच्याशी झाला होता. दोघेही एक कंपनीत काम करत असल्याने दोघांचे प्रेमसंबंध तयार झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. मुलीच्या इच्छेमुळे मुलीच्या आई-वडिलांनी लाखो रुपये खर्च करून विवाह करून दिला. त्या वेळी लव आणि त्याच्या नातेवाईकांनी अवास्तव मागण्या केल्या. त्यांनी ५० हजार डाॅलर हुंडा दिला. त्यानंतर त्यांच्या मागण्या वाढत राहिल्या. एवढे पैसे देऊनही आपली मुलगी ही सुखात राहीन असे त्यांना वाटले.
मात्र, तरुणीसह तिच्या घरच्यांना भ्रमनिरास झाला. या तरुणीने धर्मांतर करावे यासाठी तिच्यावर दबाब टाकला जाऊ लागला. दीर कुश याने तिची बदनामी केली. काही दिवसांनी तिचा पती लव अमेरिकेत नोकरीसाठी गेला. त्याने तिला अमेरिकेत बोलावून घेतले. लवने त्या ठिकाणी तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
हा छळ असह्य झाल्याने तरुणीने अखेर अमेरिकेतील पोलिसांकडे धाव घेतली. अमेरिकन पोलिसांनी तिची सुटका करून भारतीय दूतावासाकडे सुपूर्द केले. तरुणीच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि तिला घेऊन पुण्यात आले. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीवार तपास करत आहेत.
विभाग