Tansa Sanctuary Fire : तानसा अभयारण्यात भीषण वणवा; दुर्मिळ वनऔषधी वनस्पती भस्मसात
Tansa Sanctuary Fire : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात वनवा भडकला. अभयारण्यात लागलेल्या आगीमुळे अनेक दुर्मिळ वनऔषधी नष्ट झाली आहे. तसेच वन्य प्राण्यांना देखील धोका निर्माण झाला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्धी असलेल्या शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात मोठा वनवा लागला आहे. या घटनेत अभयारण्यातील अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती जाळून खाक झाली असून आगीमुळे अनेक वन्य प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. सायंकाळच्या सुमारास हा वणवा लागला असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न वनविभागाने केला. मात्र, आग मोठी असल्याने नियंत्रण मिळवता आले नाही.
ट्रेंडिंग न्यूज
ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्धी असलेल्या शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य आहे. येथील दुर्मिळ औषधी वनस्पती आणि वन्य प्राण्यांसाठी हे जंगल प्रसिद्ध आहे. बुधवारी सायंकाळी अचानक जंगलात वनवा भडकला. ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र, पाहता पाहता वनव्याने भीषण रूप धारण केले.
आग जंगलात पसरू लागली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, वनकर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे कर्मचारी कमी असल्याने आगीवर नियंत्रण मिळवतांना अडचणी आल्या. दरम्यान, वनवा हा चांगलाच भडकल्याने येथील अनेक दुर्मिळ वनसंपत्ती ही आगीत भस्मसात झाली. अनेक वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला.
जंगलाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या वनसंपत्तीचे नुकसान होते. मात्र, वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आग लागल्यानंतर ग्रामस्थ कोणत्याही अग्निशमन साधनशिवाय आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी वनविभागाशी तात्काळ संपंर्क न झाल्याने आगीचे रूपांतर वणव्यात होते. परिणामी अधिक नुकसान होत आहे.