मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 31 December 2022 Live Updates Marathi Breaking News

Marathi News Live Updates(HT)

Marathi News 31 December 2022 Live : मुंबईत नंगटपणा करणाऱ्या उर्फी जावेदला अटक करा- चित्रा वाघ

Marathi News Live Updates : मुंबईत सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेद ही नंगटपणा करत असून तिला रोखण्यासाठी पोलिसांकडे काही कलमं आहेत की नाही?, निष्पाप महिला विकृतांच्या शिकार होत असताना ही बया विकृती पसरवत असून उर्फीला तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

Mon, 02 Jan 202305:16 AM IST

Share Market Update : शेअर बाजाराची उसळी, सेन्सेक्समध्ये २७० अंकांची वाढ

नव्या वर्षातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात उत्साह दिसून येत आहे. सेन्सेक्स तब्बल २७० अंकांनी उसळला आहे, तर ८० अंकांनी वाढून ट्रेड करत आहे. मागील काही दिवसांत उतरती कळा लागलेला बँक निफ्टीही सावरला असून ३०० अंकांनी वाढून ट्रेड करत आहे.

Sat, 31 Dec 202204:19 PM IST

RSS Headquarters in Nagpur get bomb : खळबळजनक ! नागपुरातील संघ मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा दूरध्वनी एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 

Sat, 31 Dec 202209:05 AM IST

संजय राऊत, अनिल देशमुख प्रकरणावरून पवारांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

संजय राऊत, अनिल देशमुख प्रकरणावरून राज्य सरकारनं धडा घेतला पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हाणला होता. त्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. नरेटिव्ह तयार करण्याच्या आधी अनिल देशमुख यांच्या जामिनचा जो आदेश आहे, तो पवार साहेबांनी वाचला पाहिजे. मग कोर्टानं काय म्हटलंय हे त्यांच्या लक्षात येईल, असं फडणवीस म्हणाले.

Sat, 31 Dec 202206:47 AM IST

Chitra Wagh : उर्फी जावेदला अटक करा; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी

Chitra Wagh On Urfi Javed : सोशल मीडियावर सातत्यानं अश्लिल फोटो आणि रिल्स शेयर करणाऱ्या उर्फी जावेदला अटक करण्याची मागणी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेद ही नंगटपणा करत असून तिला रोखण्यासाठी पोलिसांकडे काही कलमं आहेत की नाही?, निष्पाप महिला विकृतांच्या शिकार होत असताना ही बया विकृती पसरवत असून उर्फीला तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

Sat, 31 Dec 202206:47 AM IST

Rishabh Pant Car Accident : अनिल कपूर-अनुपम खेर यांनी घेतली ऋषभ पंतची भेट

Rishabh Pant Health Update : कार अपघातात जखमी झालेला भारताचा प्रसिद्ध यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी रुग्णालयात भेट घेतली आहे. त्यानंतर अभिनेत्यांनी ऋषभची प्रकृती स्थिर असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Sat, 31 Dec 202202:51 AM IST

Bhima Koregaon ShauryaDin : शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा-कोरेगावात कलम १४४ लागू

Bhima Koregaon Vijay Stambh : शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पेरणे-फाट्यासह भीमा-कोरेगावात कलम १४४ लागू केलं आहे. येत्या दोन जानेवारीपर्यंत परिसरात जमावबंदी लागू असणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याशिवाय व्हॉट्सॲप, फेसबूक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय द्वेषाच्या पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Sat, 31 Dec 202212:38 AM IST

घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटल्यानं रस्त्याला नदीचं स्वरुप; दुचाकीसह दुकानांचे साहित्या वाहून गेले

Ghatkopar Pipe Line Burst : घाटकोपरच्या असल्फामध्ये ब्रिटिशकालीन ७२ इंचाची जलवाहिनी फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाईपमधून पाण्याचे मोठे फवारे बाहेर पडत असून रस्त्याला नदीचं स्वरुप आलं आहे. परिणामी त्यात काही दुचाकी आणि दुकानानं साहित्य वाहून गेल्याची माहिती आहे.

Sat, 31 Dec 202211:49 PM IST

Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशन संपताच राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुण्यासह नाशिकमध्ये आयुक्त बदलले

IAS Officers Transferred : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांचीही बदली करण्यात आली असून पुणे, नाशिक आणि नागपुर या तीन शहरांना नवे आयुक्त देण्यात आले आहेत. बदली झालेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या यादीत राजेश पाटील, दीपक सिंगला आणि भाग्यश्री बानायत या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Sat, 31 Dec 202211:46 PM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान

Bharat Jodo Yatra : देशासाठी जितकं बलिदान काँग्रेस पक्षानं दिलं आहे, तितकं कुणीही दिलेलं नाही. आम्ही सत्तेसाठी नाही तर गरिबांसाठी राजकारण करतो, जनतेच्या मनात आलं तर ती कुणालाही सत्तेतर बसवू शकते. त्यामुळं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे फक्त विरोधीपक्षाचाच चेहरा नसतील तर ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं आहे.