मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra MLC Election : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान; नाशिक मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष

Maharashtra MLC Election : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान; नाशिक मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 30, 2023 08:56 AM IST

Maharashtra MLC Election : नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोन बाजी मारणार आणि कोन पराभूत होणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Maharashtra MLC Election
Maharashtra MLC Election

मुंबई : राज्यात सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची चुरस सुरू असून या साठी आज मतदान होत आहे. प्रशासनाने मंतदानाची तयारी केली असून मतदान केंद्रावर बंदोबस्त ठेवला आहे. नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. यात सर्वाधिक लक्ष हे नाशिकच्या निवडणुकीकडे लागून आहे. सत्यजित तांबे बाजी मारणार का हे दोन फेब्रुवारी रोजी कळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी सकाळी ८ पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ४ पर्यंत मतदान सुरू राहणार आहे. २ दोन फेब्रुवारी रोजी मत मोजणी होणार संध्याकाळ पर्यन्त निंवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या पाचही जागांसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात ही लढत होणार असून यात कोन बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली आणि सगळ्याचं लक्ष असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची आहे. या ठिकाणी काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी एनवेळी अर्ज मागे घेतला. तर त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे याने अपक्ष म्हणून फॉर्म भरला. यामुळे पिता पुत्रावर कॉँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई म्हणून दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. यामुळे सत्यजित तांबे यांनी पक्षाला राम राम करत निवडणूक जिंकण्याचे ठरवले आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या समर्थनाने विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले आणि भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. तर अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धिरज लिंगाडे तर भाजप, शिंदे गट आणि रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. कोकण शिक्षक मतदार संघात मआविचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील तर भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर औरंगाबात शिक्षक मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग