मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgaon Crime: जळगाव हादरले ! आर्थिक तणावातून वृद्धासह पत्नी अन् मुलाची आत्महत्या, एकाचा मृत्यू

Jalgaon Crime: जळगाव हादरले ! आर्थिक तणावातून वृद्धासह पत्नी अन् मुलाची आत्महत्या, एकाचा मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 07, 2023 07:31 AM IST

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील वादळी येथे धक्कादायक घटना घडली आहे. आर्थिक विवंचेनेतून एकाच कुटुंबातील वृद्ध आणि पती पत्नी यांनी आत्महत्या केली. यातील एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर आहेत.

Crime
Crime

जळगाव : डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि उदरनिर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने आयुष्य जगायचे कसे या विवंचनेत तिघांनी गुरुवारी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जळगाव तालुक्यातील वडली येथे घडली. यात वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याच्या पत्नी आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे. दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण दंगल पाटील (वय ६६, रा. वडली ता. जळगाव) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. नारायण पाटील हे त्यांची पत्नी पत्नी भारती नारायण पाटील आणि मुलगा गणेश नारायण पाटील याच्यासोबत वडली येथे राहत होते. त्यांना दोन मुली देखील आहेत. त्यांची लग्ने झाले आहेत. एक मुलगा रोजगारानिमित्ताने दुसऱ्या गावी राहतो.

गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब आर्थिक विवंचेनेत होते. यातूनच गुरुवारी सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील यांनी विषारी औषध प्यायले. यानंतर त्यांची प्रकृती ही बिघडली.

दरम्यान, गणेशनं त्यांच्या मित्राला ही बाब फोन करून सांगितली. त्याचा मित्र श्याम हा घरी गेल्यावर आईवडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. ही बाब श्यामने तातडीने ग्रामस्थांना सांगितली. त्यांनी तातडीने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले.

मात्र, उपचार सुरु असतांना नारायण दंगल पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मुलगा आणि पत्नीची प्रकृती ही चिंताजनक आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग