मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Crime News : बिबट्याची शिकार करून कातडीची तस्करी; कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अटक

Nashik Crime News : बिबट्याची शिकार करून कातडीची तस्करी; कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 04:46 PM IST

Dindori Crime News : बिबट्याची शिकार करून त्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कॉलेजचे विद्यार्थी असल्यानं दिंडोरीत खळबळ उडाली आहे.

Dindori Nashik Crime News
Dindori Nashik Crime News (HT)

Nashik Crime News : बिबट्याची शिकार करून त्याच्या कातड्याची तस्करी करण्याच्या प्रयत्ना असलेल्या आरोपींना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या १५ दिवसांत प्राण्यांची कातडीची तस्करी करणारी तिसरी टोळी जेरबंद झाल्यानं नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे एका कॉलेजमध्ये शिकतात. विद्यार्थ्यांनीच बिबट्याची शिकार करून त्याच्या कातड्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्यानं जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही आरोपी नाशिक शहरात बिबट्याची कातडी तस्करीसाठी आणणार असल्याची माहिती नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ठरलेल्या वेळेत बनावट ग्राहकांना इंदिरा नगर परिसरात कातड्याला खरेदी करण्यासाठी पाठवलं. त्यानंतर आरोपी हे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ येताच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून बिबट्याच्या कातडीसह चिकारा आणि निलगाईचे दोन शिंगे आणि चार मोबाईल जप्त केले आहे.

आरोपी कॉलेजचे विद्यार्थी...

पोलिसांकडून अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे एका कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यामुळं या प्रकरणात त्यांच्यासह आणखी काही साथीदार सहभागी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचाही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वन्य प्राण्यांची हत्या करून त्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड केला होता. त्यावेळी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एका टोळीला नाशिकमध्येच जेरबंद करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग