मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यातील नामांकित शाळेतील १० वीतील मुलगी गरोदर राहिल्याने खळबळ; तपासात पुढे आली धक्कादायक माहिती

Pune Crime : पुण्यातील नामांकित शाळेतील १० वीतील मुलगी गरोदर राहिल्याने खळबळ; तपासात पुढे आली धक्कादायक माहिती

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 21, 2022 04:33 PM IST

Pune crime : पुण्यात खडकी परीसारतील एका नामांकित शाळेतील १० वीतील मुलगी ही गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती मिळाली आहे.

 Girl Student
Girl Student (HT)

पुणे: खडकी परिसरातील एका नामांकित शाळेत शिकणारी १० वी तील १६ वर्षांची मुलगी ही गर्भवती राहिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या मुलीच्या मैत्रिणीच्या भावाच्या मित्राने तिच्यावर बळजबरी करून शरीर संबंध ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळेच ही तरुणी गर्भवती राहिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी तरुणाला देखील अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी १६ वर्षीच्या पीडित मुलीने तक्रार दिली आहे. तयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी सध्या दहावीत आहे. ती खडकी येथील वर्गात शिक्षण घेते. दरम्यान तिच्या मैत्रिणीच्या भावाच्या मित्राची ओळख तिच्या मैत्रिणीने करून दिली होती. त्याने मुलीशी ओळख वाढवली. दोघेही बोलू लागले. दारम्यान एक दिवस बोलण्याच्या बहाण्याने तिला आरोपीने खडकी येथील एका लॉजवर नेले आणि त्या ठिकाणी तिच्या मर्जी विरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने हा प्रकार चार ते पाच वेळा केला. जर कुणाला काही सांगितल्यास तिला यांनी तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तिने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही.

मात्र, काही दिवसांपूर्वी या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिची आई तिला दावख्यात घेऊन गेली. या नंतर ती गर्भवती असल्याचे कळले. अधिक तपास खडकी पोलीस करत आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग