मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ram Pran Pratishtha : नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला अयोध्येत श्रीराम पूजेचा मान, कोण आहे हे दाम्पत्य?

Ram Pran Pratishtha : नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला अयोध्येत श्रीराम पूजेचा मान, कोण आहे हे दाम्पत्य?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 19, 2024 05:06 PM IST

Ram mandir Inauguration : २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी रामलल्लाच्या मूर्तीची पूजा करण्याचा मान महाराष्ट्रातील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे.

Kamble couple honored worshiping ram lalla
Kamble couple honored worshiping ram lalla

राम अयोध्येतील राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टकडून जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी देशासह जगभरातील जवळपास ६ हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून पूजा करण्याचा मान देशातील ११ दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात महाराष्ट्रातील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. कांबळे दाम्पत्य नवी मुंबईतील खासघऱ येथे वास्तव्यास आहेत.  

ट्रेंडिंग न्यूज

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राम लल्लाची पूजा करण्याचा ११ राज्यातील जोडप्यांना मिळाला आहे. यात महाराष्ट्रातील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात पूजा करण्याचा मान कांबळे कुटुंबियांना मिळणार आहे.

कांबळे कुटुंबीय खारघर सेक्टर २१ मधील हावरे स्प्लेंडर येथे वास्तव्यास आहेत. त्यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण ३ जानेवारी रोजी मिळाले आहे. ते उद्या (२० जानेवारी) मुंबईतून आयोध्येकडे रवाना होणार आहेत.

कोण आहेत विठ्ठल कांबळे -

विठ्ठल कांबळे आरएसएसचे स्वंयसेवक असून ते कारसेवकही होते. १९९२ च्या राम मंदिर आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. विठ्ठल कांबळे हे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तसेच ते आरएसएसचे रायगड जिल्हा सेक्रेटरी देखील आहेत. आई-वडिलांमुळे घरात वारकरी संप्रदाय असल्याने अयोध्येच्या निमंत्रणाने कांबळे परिवार आनंदी झाले आहेत.

 राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील महत्वाच्या व्यक्तींची यादी करण्याची जबाबदारी विठ्ठल कांबळे यांच्याकडे होती. मात्र त्यांनाच पूजेचे निमंत्रण आल्याने आयुष्याचे सार्थक झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. राम मंदिर पूजेसाठी त्यांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. पाच दिवस नियम पालन केल्यानंतर २२ जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या प्राणाचा अभिषेक होईल, त्यानंतरच जोडप्यांचा संकल्प आणि विधीही पूर्ण होतील.

IPL_Entry_Point