मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Gadkari : '...तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोजरखाली टाकीन', नितीन गडकरींचा लोकप्रतिनिधींना टोला

Nitin Gadkari : '...तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोजरखाली टाकीन', नितीन गडकरींचा लोकप्रतिनिधींना टोला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 29, 2023 05:13 PM IST

Nitin Gadkari : रस्त्याला तडा गेला, खड्डे पडले किंवारस्ता खराब झाला तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोजरखाली टाकीन,असा इशारा नितीन गडकरी यांनी दिला आहे.

nitin Gadkari
nitin Gadkari

वाशिम - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी रस्त्यांच्या कामांवरून आमदार-खासदारांना टोला लगावला आहे. मी दबाव टाकून ठेकेदाराकडून काम करून घेत असतो, मात्र तुम्ही ठेकेदारांना त्रास देऊ नका, असा दम नितीन गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील आमदार-खासदारांना दिला आहे. त्याचबरोबर जर रस्त्याला तडा गेला, खड्डे पडले किंवा रस्ता खराब झाला तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोजरखाली टाकीन, असा इशाराही नितीन गडकरी यांनी दिला आहे.
 

ट्रेंडिंग न्यूज

नितीन गडकरी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडला.  या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी ठेकेदार व आमदार-खासदारांवर निशाणा साधला. वाशिम जिल्ह्यातील ३,६५५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच ५९५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. 

नितीन गडकरी म्हणाले, राजकारण करताना खोटं बोलण्याची काहीच गरज नाही. तुम्ही चांगले काम केले तर, लोक तुम्हाला मानतात. त्यासाठी पोस्टर, बॅनर लावण्याची काहीच गरज काय? असा टोलाही नितीन गडकरी यांनी लगावला.
 

मी राजकारणात खोटं बोलणार नाही, निवडणुकीत बॅनर लावणार नाही, कोणाला दारू पाजणार नाही, मी पैसे खाऊ घालणार नाही आणि खाणार नाही. मला फक्त लोकांची सेवा करायची आहे, असं वक्तव्यही नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केलं.
 

नितीन गडकरी यांच्याहस्ते वाशिम ते मेडशी आणि मेडशी ते अकोला तसेच वाशिम ते वारंगा फाटा रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर कारंजा ते मूर्तिजापूर या मार्गाचे  चारपदरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आलं.

IPL_Entry_Point