मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  hindu jan akrosh morcha : मुंबईतील शिवाजी पार्कवर आज हिंदू जन आक्रोश मोर्चा

hindu jan akrosh morcha : मुंबईतील शिवाजी पार्कवर आज हिंदू जन आक्रोश मोर्चा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 29, 2023 11:09 AM IST

hindu jan akrosh morcha at Azad Maidan mumbai : लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

hindu jan akrosh morcha mumbai
hindu jan akrosh morcha mumbai

hindu jan akrosh morcha at Azad Maidan mumbai : लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पिडीताही सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल. अनेक भाजपचे नेते सुद्धा या मोर्चाला हजेरी लावणार आहेत. 

     देशात तसेच राज्यात वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटना, मुंबईत फोफावलेले लँड माफिया तसेच मशिदीवरील भोंग्या विरोधात  सकल हिंदू समाजातर्फे  महामोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा शांततेत पार पाडवा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. 

 छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजमात अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या राज्यात आज लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यांनी उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजाच्या मुली, तसेच महिला या आज असुरक्षित झाल्या आहेत. हिंदू मुली, महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत.  मुंबईतील कॉल सेंटर मधे काम करणारी श्रद्धा वालकर याचे ताजे उदाहरण आहे.  अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. 

यामुळे याचा जाब प्रशासनाला विचारण्यासाठी मुंबईच्या सकल हिंदू समाजातर्फे आज १० वाजता छत्रपती शिवाजी पार्क येथून विराट जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा कामगार मैदान मार्गे प्रभादेवी येथे पोहचणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गैर प्रकार टाळण्यासाठी शीघ्र कृती दलाचे पथक देखील तैनात ठेवण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग