Minakshi Patil death : माजी मंत्री, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचं निधन-former minister shetkari kamgar party leader meenakshi patil passed away ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Minakshi Patil death : माजी मंत्री, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचं निधन

Minakshi Patil death : माजी मंत्री, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचं निधन

Mar 29, 2024 10:12 AM IST

meenaskhi patil death news : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं आज निधन झालं.

माजी मंत्री, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचं निधन
माजी मंत्री, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचं निधन

Meenakshi Patil Passed away : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व राज्याच्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं आज (२९ मार्च) निधन झालं. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मीनाक्षी पाटील यांच्या निधनामुळं एक झुंजार नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

मीनाक्षी पाटील या अलिबाग (Alibaug) विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार होत्या. १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. शेकापचे नेते जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. अलिबागच्या जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी विधीमंडळात आवाज उठवला होता. जनहिताच्या मुद्द्यांवर त्या सभागृहात सत्ताधाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरत. एकेकाळी राज्यभरात पसरलेला शेतकरी कामगार पक्ष (Shetkari Kamgar Paksha) कालांतरानं प्रभावहीन झाला. मात्र, रायगड जिल्ह्यात शेकापची ताकद आजही टिकून आहे. त्यात मीनाक्षी पाटील यांचा मोठा वाटा होता. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.

Whats_app_banner
विभाग