लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय तोफगोळे उडू लागले आहेत. अनेक नेत्यांमध्ये वाक् युद्ध रंगले असून काही नेते विरोधकांना भीती दाखवण्यासाठी धमक्याही देत आहेत. आता काँग्रेस आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. केदार यांनी सरकारी अधिकारी व सरकारला थेट धमकी दिली आहे. बुधवारी रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांकडून नामांकन दाखल करण्यात आले. यावेळी आमदार सुनील केदार यांनी म्हटले की, पुढच्या वेळी तुरुंगातून बाहेर आल्यास घरात जाऊन हाल करेन, कोणाला सोडणार नाही.
काँग्रेस आमदार विधायक सुनील केदार यांना जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात पाच वर्षाचा तुरुंगवास झाला असून सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सुनील केदार यांनी म्हटले की, मी सत्ताधाऱ्यांना इतकंच सांगू इच्छितो की, तुम्ही व तुमच्या सरकारचे अधिकारी दोघे ऐका की, पुढच्या वेळा जर सुनिल केदार यांच्यावर हल्ला केला तर त्याला फासावर लटकवा. त्याला सोडू नका, कारण पुढच्या वेळेला बाहेर आल्यास तुमच्या घरात येऊन तुमचे हाल करेल. तुम्हाला सोडणार नाही. मी शेवटपर्यंत लढेन, जर मी लढणार नाही तर कोण लढणार?
रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. रामटेकमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट सामना आहे. काँग्रेसने येथे रश्मी श्याम कुमार बर्वे यांनी उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेकडून राजू देवनाथ पारवे मैदानात आहेत. त्यांनी नुकतीच काँग्रेस सोडून शिवसेना ज्याईन केली आहे.