मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena vs Shinde Group : भरमुलाखतीत खैरे रामदास कदमांवर संतापले; पायातला बूट काढत म्हणाले…

Shiv Sena vs Shinde Group : भरमुलाखतीत खैरे रामदास कदमांवर संतापले; पायातला बूट काढत म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 02:18 PM IST

Shiv Sena vs Shinde Group : रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. यावेळी चंद्रकांत खैरेंनी थेट पायातला बूट काढून कदमांना आव्हान दिलं आहे.

Chandrakant Khaire vs Ramdas Kadam
Chandrakant Khaire vs Ramdas Kadam (HT)

Chandrakant Khaire vs Ramdas Kadam : शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं चंद्रकांत खैरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. औरंगाबादेत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रामदास कदम यांच्याबाबत बोलताना थेट पायातलं बूट काढून संताप व्यक्त केला आहे. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर लोक त्यांना जोड्यानं मारतील, अशी टीकाही खैरेंनी रामदास कदमांवर केली आहे. औरंगाबादमध्ये रामदास कदम यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं, त्यावेळी खैरेंनी शिंदे गटावर संताप व्यक्त केला आहे.

रामदास कदम यांनी ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, रामदास कदम हे औरंगाबादचे पालकमंत्री असताना त्यांनी अनेक लोकांना त्रास दिला, परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांना संभाळून घेतलं. त्यांना ज्या माणसानं मंत्री केलं त्यांच्याबद्दलच ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. कदमांचा मेंदू सडलाय की काय?, अशी शंका आम्हाला आहे, असं म्हणत त्यांनी रामदास कदमांवर टिकास्त्र सोडलं आहे. आता त्यांना लोक जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही, असं सांगत त्यांनी पायातलं बूट काढत रामदास कदम यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेकडून राज्यभरात आंदोलन...

शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता वैयक्तिक पातळीवरील टीकेवर येऊन पोहचला आहे. रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून राज्यभरात त्याचा निषेध केला जात आहे. पुण्यात शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केलं आहे. यावेळी आंदोलनात महिला शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

IPL_Entry_Point