Electric buses : मुंबई-पुण्यादरम्यान धावणार इलेक्ट्रीक बसेस; नितीन गडकरींनी सांगितली योजना-e buses between mumbai pune and other cities and some long route says nitin gadkari ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Electric buses : मुंबई-पुण्यादरम्यान धावणार इलेक्ट्रीक बसेस; नितीन गडकरींनी सांगितली योजना

Electric buses : मुंबई-पुण्यादरम्यान धावणार इलेक्ट्रीक बसेस; नितीन गडकरींनी सांगितली योजना

Mar 18, 2024 11:18 PM IST

Nitin Gadkari on E-Buses : केंद्रसरकार येत्या पाच वर्षात भारतातील सर्व शहरात आणि दिल्ली-शिमला, दिल्ली-चंदीगड तसंच मुंबई-पुणेसारख्या लांब मार्गांवर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याची योजना आखत आहे.

मुंबई-पुण्यादरम्यान धावणार  इलेक्ट्रीक बसेस
मुंबई-पुण्यादरम्यान धावणार  इलेक्ट्रीक बसेस

Mumbai Pune Electric Bus :  मुंबईत बेस्ट प्रशासनाकडून ई-बसेस धावत आहेत. त्याच धर्तीवर आता मुंबई-पुण्यासारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरही इलेक्ट्रीक बसेस धावणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार येत्या पाच वर्षात भारतातील सर्व शहरात आणि दिल्ली-शिमला,  दिल्ली-चंदीगड तसंच मुंबई-पुणेसारख्या लांब मार्गांवर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याची योजना आखत आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी भारतात सुरू होणाऱ्या इलेक्ट्रिक बसबाबत भाष्य केलं. गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रीक वाहनांमध्ये असणाऱ्या लिथियमच्या बॅटरीच्या किंमतीत घट झाल्याने प्रवास भाडेही कमी होऊ शकते. त्याचबरोबर सर्वात मोठा लाभ म्हणजे वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यास मदत मिळू शकते. 

सध्या लिथियम-आयर्न बॅटरीची किंमत ११२ डॉलर प्रति किलोवॅट प्रति तास इतकी झाली आहे. यापूर्वी ती १५० डॉलर होती. यात आणखी घट होऊन बॅटरी १०० डॉलरपर्यंत पोहोचेल तेव्हा इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेलच्या वाहनांप्रमाणे सर्वत्र दिसतील. पेट्रोल वाहनांवर जर तुम्ही महिन्याला २० ते २५ हजार खर्च करत असाल तर इलेक्ट्रिक वाहनांवर केवळ १० टक्के म्हणजे दोन ते तीन हजार रुपये खर्च करावे लागतील.

देशात इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात तेजीचे वातावरण असून सध्या ४०० कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादन करतात. सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ई-वाहनांमध्ये गुंतवणूक वाढत आहे.

विभाग