मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यसभेची खासदारकी मिळताच मुन्ना महाडिकांचा सतेज पाटलांना अप्रत्यक्ष इशारा..

राज्यसभेची खासदारकी मिळताच मुन्ना महाडिकांचा सतेज पाटलांना अप्रत्यक्ष इशारा..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 12, 2022 03:36 PM IST

कोल्हापुरात महाडिकांचा दबदबा कालही होता, आजही आहे आणि पुढील १०० वर्ष राहील असे सांगत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना एकप्रकारे जाहीर इशारा दिला आहे.

मुन्ना महाडिकांचा सतेज पाटलांना अप्रत्यक्ष इशारा..
मुन्ना महाडिकांचा सतेज पाटलांना अप्रत्यक्ष इशारा..

Dhananjay Mahadik :राज्यसभेच्या शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने पुरेसे संख्याबळ नसतानाही सहाव्या जागेवर विजय मिळवला व कोल्हापुरातील महाडिकांची पराभवाची मालिका खंडीत झाली. तब्बल आठ वर्षांनी विजयाची चव चाखलेल्या नुतन खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या स्वागताची जय्यत तयारी कोल्हापुरात करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच कराडमध्येच धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याचे पालकमत्री सतेज पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरचे राजकारण येत्या काळात बदलणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धनंजय महाडिक पत्रकार परिषदेत म्हणाले की, पुरेसे संख्याबळ असल्यानेच मला उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे घोडेबाजार करण्याचा प्रश्नच येत नाही. आमदार काही विकावू नाहीत. राज्यसभेला गुप्त मतदान पद्धत नसतानाही भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील काही आमदारच नाराज आहेत त्यांनी सरकारच्या कार्यशैलीवरच प्रश्न उपस्थित केल्याचे महाडिक म्हणाले.

धनजंय महाडिक म्हणाले की, संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार २०१९ मध्ये अस्तित्वात आले असलं, तरी हे तिन्ही पक्ष पहिल्यापासूनच कोल्हापुरात महाडिकांविरुद्ध लढतात. कोल्हापूरमध्ये भाजपचा एकही आमदार- खासदार नाही, महापालिकेत सत्ता नाही, जिल्हा परिषदेत सत्ता होती, पण ती आता नाही. त्यामुळे सर्व सत्तास्थाने परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. महाडिकांचा दबदबा कालही होता, आजही आहे आणि पुढील १०० वर्ष राहील असे सांगत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना एकप्रकारे जाहीर इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे.

धनंजय महाडिकांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत -

खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापूरमध्ये जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. सलग पराभवानंतर महाडिक कुटुंबात विजय झाला असल्याने जल्लोषी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. २०१५ मध्ये महादेव महाडिक विधानपरिषद निवडणूक हरले होते, त्यानंतर २०१९ मध्ये मुन्ना महाडिक लोकसभेची निवडणूक हरले, त्याचवर्षी अमल महाडिक कोल्हापूर उत्तरमधून पराभूत झाले. गेल्यावर्षी गोकुळच्या निवडणुकीतही महाडिक गटाचा पराभव झाला. त्यामुळे राज्यसभेतील विजय महाडिक गटाला संजीवनी देणारा ठरणारा आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या