मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis Kannad Speech : कर्नाटकात फडणवीसांची थेट कन्नडमधून भाषणाला सुरुवात, म्हणाले...

Devendra Fadnavis Kannad Speech : कर्नाटकात फडणवीसांची थेट कन्नडमधून भाषणाला सुरुवात, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 21, 2023 10:40 PM IST

Devendra Fadnavis In Karnataka : कर्नाटकातील चिक्कमंगलुरू येथे सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

DCM Devendra Fadnavis In Chikkamangaluru Karnataka
DCM Devendra Fadnavis In Chikkamangaluru Karnataka (HT)

DCM Devendra Fadnavis In Chikkamangaluru Karnataka : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील चिक्कमंगलुरू येथील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट कानडी भाषेतून भाषणाला सुरुवात केली. त्यामुळं कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या भाषणाला भरभरून दाद देत टाळ्या वाजवत फडणवीसांचं स्वागत केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या या भाषणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यात त्यांनी चिक्कमंगलुरू येथील महापालिकेच्या कामाचंही कौतुक केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चिक्कमंगलुरू येथील सांस्कृतिक महोत्सवात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं, त्यावेळी मी ते लगेच स्वीकारलं. याशिवाय माझे बंधू सीटी रवी यांच्या प्रेमामुळंही मला चिक्कमंगलुरूमध्ये यावं लागलं. ते जे काही करतात ते मोठंच असतं. त्यामुळं मला या ठिकाणी येऊन मोठा महोत्सव पाहायला मिळणार याची खात्री होती. त्यामुळंच मी कार्यक्रमाला होकार दिल्याचं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे फार जुने मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. मराठीसह कन्नड भाषाही प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे. दोन्ही भाषेतील साहित्य हे लोकांना दिशा देणारं आहे. आजपर्यंत मी देशातील अनेक शहरांमध्ये गेलेलो आहे. परंतु चिक्कमंगलुरू इतकं सुंदर आणि स्वच्छ शहर मी कुठेही पाहिलेलं नाही. चिक्कमंगलुरूमध्ये दाखल झाल्यानंतर शहरातील स्वच्छता पाहून मी भारावून गेलो. याचं संपूर्ण श्रेय हे सीटी रवी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जातं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्कमंगलुरू महापालिकेचं कौतुक केलं आहे.

IPL_Entry_Point