मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mallikarjun Kharge on Modi : मराठी म्हणीचा वापर करत खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Mallikarjun Kharge on Modi : मराठी म्हणीचा वापर करत खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 01, 2023 06:00 PM IST

Mallikarjun Kharge on narendra Modi : 'मोदी खोटं बोलतात,पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे,खोटं बोला पण रेटून बोला,असं ते करतात,अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Mallikarjun Kharge on narendra Modi
Mallikarjun Kharge on narendra Modi

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची दोन दिवसीय बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले तसेच१३ जणांची एक समन्वय समिती स्थापित करण्यात आली. यामध्ये शरद पवार, संजय राऊत, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, खासदार के. सी. वेणुगोपाल, खासदार राघव चड्ढा यांच्यासह १३ नेत्यांचा सहभाग आहे. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठी म्हणीचा वापर करत जोरदार टोला लगावला

ट्रेंडिंग न्यूज

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, 'मोदी खोटं बोलतात, पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे, खोटं बोला पण रेटून बोला,असं ते करतात, अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

कोणालाही न सांगता संसदेच विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मणिपूर जळताना, कोरोनावेळी, चीन आपल्या जमिनीवर कब्जा करत आहे, नोटाबंदी तेव्हा विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं नाही. प्रसारमाध्यमे आपल्या बाजुने असल्याचं मोदी मानतात.

 

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं मोदी म्हणतात मात्र,आपल्या मित्रांना खाण्यास देऊन लोकांना उपाशी मारत आहेत. ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र,आम्ही भित्रे नाही आहोत,असं खर्गे यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point