मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  G-20 Summit: दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका

G-20 Summit: दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 09:41 AM IST

Maharshtra Political News : जी २० परिषदेचे अध्यक्षपद हे भारताला मिळाले असून या परिषदेच्या आयोजना संदर्भात दिल्ली येथे सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उद्धव ठाकरे हे अनुपस्थित राहिले. या वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचावर निशाणा साधला आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde (HT_PRINT)

दिल्ली: जगाभारत महत्वाची असलेल्या जी २० शिखर परिषदेचे अध्यक्षपद हे यावर्षी भारताला मिळाले आहे. या अध्यक्षपदाचा स्वीकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या परिषदेच्या नियोजनासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला उद्धव ठाकरे हे अनुपस्थित राहिले. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'त्यांचे देशप्रेम हे बेडगी आहे', असे प्रसारमध्यमांशी बोलत शिंदे यांनी टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. जी २० सारख्या मोठ्या परिषदेचे यजमानपद मिळणे हे देशासाठी गौरवाची गोष्ट आहे. हा फक्त केंद्राचा कार्यक्रम नव्हता. तर महाराष्ट्रात या परिषदेच्या ४ महत्वाच्या बैठका होत आहेत. या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या बैठकीचे निमंत्रण सर्व पक्षाला देण्यात आले होते. मात्र राज्याचं तसेच देशाचं देशप्रेम यातून दिसलं. या बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचंय? हे बेगडी प्रेम आहे, मी मुख्यमंत्री झालो तर काही लोक घराबाहेर आले. आता आम्ही समृद्धी मार्गावर गेलो तर काही लोक रस्त्यावर आले, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले, बेळगांव सीमा बांधवांबद्दल बोलत आहेत, त्यांनी धाडसीपणा आम्हाला सांगू नका. हा एकनाथ शिंदे ४० दिवस जेल मध्ये राहिलाय. विकासाच्या गप्पा मारणा-यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते आज कार्यक्रमाला आले नाही. अजित दादा तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग