मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad Crime : संतापजनक ! औरंगाबाद येथे महिलेची छेड काढल्याप्रकरणी ACP वर गुन्हा दाखल

Aurangabad Crime : संतापजनक ! औरंगाबाद येथे महिलेची छेड काढल्याप्रकरणी ACP वर गुन्हा दाखल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 15, 2023 12:06 PM IST

Aurangabad Crime News : औरंगाबादच्या सहायक पोलीस आयुक्तावर महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Aurangabad Crime
Aurangabad Crime

औरंगाबाद : औरंगाबाद पोलिस दलात थेट सहायक पोलिस आयुक्तावर महिलेची छेड काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शहरातील सिटी चौक पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे असे गुन्हा दाखल झालेल्या ACP चे नाव आहे. ढुमे हे नाईट ड्युटीवर असताना त्यांनी रात्री २ च्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेड काढली. त्यामुळे संबंधित महिलेले थेट पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली आहे. विशाल ढुमे हे काल रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांचा मित्र देखील सोबत होता. यावेळी त्याची पत्नी देखील सोबत होती. दरम्यान, दोघे काल भेटले. दरम्यान, त्याच्या कडे गाडी नसल्याने मला लिफ्ट मिळेल का? अशी विनंती ढुमे यांनी मित्राला केली. मित्राने त्यांना सोडण्यास होकार दिला. त्यांनी त्यांना गाडीत बसवले. मित्र आणि त्याची पत्नी ही कारमध्ये पुढे बसले होते. ढुमे हे गाडीत दारूच्या नशेत असल्याने त्यांनी त्याच्या मित्राच्या पत्नीची गाडीत छेड काढली. ढुमे याने महिलेच्या पाठीवरून हात फिरवत टीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

दरम्यान, मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला असे ढुमे यांनी मित्राला सांगितले. घरी गेल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे, म्हणत ढुमे याने तिथेही महिलेशी गरीवर्तन केले. याला मित्राने विरोध केला तर त्याने त्याला देखील मारहाण केली. यामुळे त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत ढुमे याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग