मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gram Panchayat Election : बोहल्यावर चढण्याआधी नवरीनं केलं मतदान; धुळ्यातील नववधूची राज्यात चर्चा

Gram Panchayat Election : बोहल्यावर चढण्याआधी नवरीनं केलं मतदान; धुळ्यातील नववधूची राज्यात चर्चा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 18, 2022 01:45 PM IST

Gram Panchayat Election : आधी लग्न लोकशाहीचे मग माझे, असं म्हणत नववधू सीमा कुंभार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळं सीमा यांनी घेतलेल्या निर्णयामुळं त्यांचं कौतुक केलं जात आहे.

Gram Panchayat Election In Dhule Dist
Gram Panchayat Election In Dhule Dist (HT)

Gram Panchayat Election In Dhule Dist : राज्यातील २८ जिल्ह्यांतील सात हजार ग्रामपंचायतींमध्ये कारभारी निवडण्यासाठी आज मतदानप्रक्रिया पार पडत आहे. धुळे जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतीत आज मतदान होत आहे. त्यामुळं सकाळपासूनच लोकांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे. परंतु धुळ्यात एका नववधूनं लग्न करण्यासाठी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळं नवरीचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे. सीमा कुंभार असं नववधूचं नाव असून त्यांनी धुळे जिल्ह्यातल्या फागणे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लग्नाच्या पोशाखात सीमा कुंभार यांनी फागणेत मतदान केलं आहे. आधी लग्न लोकशाहीचे त्यानंतर माझे, असं म्हणत त्यांनी इतरांनाही जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. लग्नासाठी नवरा मंडपात वाट पाहत असतानाच नववधू सीमा कुंभार यांनी मतदानाला जाण्याचा निर्णय घेतल्यानं संपूर्ण गावातील लोकांनी त्यांचं स्वागत केलं आहे. सीमा कुंभार यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला असून मतदान केल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

धुळे जिल्ह्यातील ११८ गावातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान जारी आहे. जवळपास सव्वाशे गावातील कारभारी निवडले जाणार असल्यानं या निवडणुकीसाठी ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठी ताकद लावली आहे. त्यामुळं आता जिल्ह्यातील सर्वाधिक जागांवर विजय मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपनं जोरदार तयारी केली आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानास प्रतिसाद दिल्यानं कोणता पक्ष बाजी मारेल, याबाबत अंदाज लावले जात आहेत.

IPL_Entry_Point