मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gangapur Road : किरकोळ वादातून तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाही चोपलं

Gangapur Road : किरकोळ वादातून तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाही चोपलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 04, 2023 08:29 PM IST

Gangapur Road Nashik : क्षुल्लक वादातून तरुणींनी नाशिकमध्ये भररस्त्यात एकमेकींचे केस ओढत तुंबळ हाणामारी केल्याची घटना समोर आली आहे.

Gangapur Road Nashik Crime News Marathi
Gangapur Road Nashik Crime News Marathi (HT)

Gangapur Road Nashik Crime News Marathi : काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरातील गंगापूर रोडवरील एका महाविद्यालय परिसरात तरुणीच्या दोन गटात पुन्हा जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून तरुणींनी एकमेकींचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी तुडवलं आहे. भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणालाही संतप्त तरुणींनी चोपल्याची घटना समोर आल्यामुळं आता नाशिकमध्ये खळबळ उडाली असून या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील एका महाविद्यालयातील तरुणींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामुळं तरुणींमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. ड्रेसकोड घातलेल्या तरुणी महाविद्यालयाच्या परिसरातच एकमेकींवर तुटून पडल्या. यावेळी तरुणींनी एकमेकींचे केस ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भररस्त्यात तरुणींमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आल्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घटनास्थळी भांडणं पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर काही तरुणांनी आणि महिला शिक्षकांनी तरुणींमधील भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु संतापलेल्या तरुणींनी त्यांच्यावरच हल्ला केला. त्यानंतर महाविद्यालयातील महिला शिक्षकांसह सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना तरुणींमधील हाणामारी सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली.

महाविद्यालय परिसरातच तरुणींमधील वाद तुंबळ हाणामारीपर्यंत का पोहचला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु बॉयफ्रेंडवरून तरुणींनी एकमेकींना मारहाण केल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळं आता महाविद्यालय प्रशासन आरोपी विद्यार्थीनींवर कारवाई करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील अनेक भागांमध्ये तरुणींमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. परंतु आता थेट महाविद्यालयीन तरुणींमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आल्यामुळं शहरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग