Prakash Ambedkar : द्रौपदी मुर्मू यांच्या आधी भाजपनं मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prakash Ambedkar : द्रौपदी मुर्मू यांच्या आधी भाजपनं मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Prakash Ambedkar : द्रौपदी मुर्मू यांच्या आधी भाजपनं मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Feb 14, 2024 12:23 PM IST

prakash ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यापूर्वी भाजपाने राष्ट्रपतीपदासाठी मला ऑफर दिली होती, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

VBA Leader Prakash Ambedkar
VBA Leader Prakash Ambedkar

prakash ambedkar : राष्ट्रपतीपद उमेदवारीवरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यापूर्वी भाजपाने राष्ट्रपतीपदासाठी मला ऑफर दिली होती, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या द्याव्याने राजकीय चर्चांना उधाण आहे आहे. ही ऑफर त्यांना कोणत्या भाजप नेत्याने दिली या बाबत मात्र, काही सांगितलेले नाही.

Manoj jarange : जरांगे पाटलांची प्रकृती खालावली! उपोषणाचा आजचा पाचवा दिवस

राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतांना प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर एका वृत्तवाहिणीशी बोलत होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. आंबेडकर म्हणाले, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यापूर्वी भाजपने तुम्हाला राष्ट्रपती बनायला आवडेल का? अशी विचारणा माझ्याकडे केली होती. तेव्हा माझ्या राजकीय जीवनातील १० वर्षे शिल्लक असून, तुम्ही मला आताच राजकारणातून काढण्याचा प्रयत्न करत आहात का? असा प्रतिप्रश्न मी त्यांना केला. जर २०२४ मध्ये राजकीय पक्षांनी व्यवस्थित काम केलं तर मी तुमच्या विरोधात आहे, याची कल्पना तुम्हला आहे. त्यामुळेच तुम्ही मला सध्याच्या राजकीय चित्रामधून काढण्याचा प्रयत्न करत आहात, असे असे उत्तर मी त्यांना दिले असे आंबेडकर म्हणाले.

मात्र ही ऑफर त्यांना कुणी दिली हे मात्र त्यांनी सांगण्याचे टाळले. यावर ते म्हणाले, मला देण्यात आलेल्या या ऑफरबाबत भाजपाच्या नेत्यांना विचारा, तेच तुम्हाला माहिती देतील. ही ऑफर मला कुणी दिली ते मी कधीही सांगणार नाही, असे देखील आंबेडकर म्हणाले. ज्या रस्त्याने जायचं नाही, त्या रस्त्याचा आम्ही कधीही विचार केला नाही. काँग्रेस- राष्ट्रवादीने आमच्याविरोधात कितीही भूमिका घेतली. तरी आम्ही भाजपासोबत कधीही हातमिळवणी केलेली नाही आणि करणार पण नाही. आज संघ आणि भाजपाच्या विचारसरणीला जर कुणी आव्हान देऊ शकत असतील, तर ते फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आहेत. त्यामुळे मला राष्ट्रपतीपद, पंतप्रधानपद आणि राज्यपालपद या सारख्या कोणत्याही ऑफर दिली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही असे ठामपणे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर