मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vedanta-Foxconn : 'जिलेटिनची गाडी उभी करून वाझेनंही...', भाजपचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

Vedanta-Foxconn : 'जिलेटिनची गाडी उभी करून वाझेनंही...', भाजपचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 18, 2022 09:34 AM IST

Atul Bhatkhalkar On Uddhav Thackeray : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Atul Bhatkhalkar On Uddhav Thackeray
Atul Bhatkhalkar On Uddhav Thackeray (HT)

Atul Bhatkhalkar On Uddhav Thackeray : पुण्यातील तळेगावात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रकल्प अचानक गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण तापलेलं आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता भाजपनंही ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकारनं हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. आता त्याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, प्रयत्न वाझेनंही केले होते, बंगला शोधण्याचे? खाली जिलेटिनवाली गाडी उभी करण्याचे. तोच वाझे जो लादेन नाही, असं ठाकरेंनी म्हटलं होतं, असं म्हणत भातखळकरांनी थेट ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिंदे गटावर आगपाखड केली होती. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना हा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच कसा?, असा सवाल करत धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेत या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य करताना गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे का?, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याला उत्तर देताना प्रकल्प गुजरातमध्ये न्यायला महाराष्ट्राला पाकिस्तान समजता का?, असा प्रतिप्रश्न केला होता. त्यामुळं आता भातखळकरांच्या टीकेमुळं शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगताना पाहायला मिळत आहे.

IPL_Entry_Point