मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे घडलं, त्यात चूक कोणाची?; राज ठाकरे म्हणाले…

Raj Thackeray : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे घडलं, त्यात चूक कोणाची?; राज ठाकरे म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 17, 2023 01:44 PM IST

Raj Thackeray on Maharashtra Bhushan Event Tragedy : खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray (Sandeep Mahankal)

Raj Thackeray on Maharashtra Bhushan Event Tragedy : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी झालेल्या श्रीसदस्यांपैकी ११ जणांचा उष्माघातानं मृत्यू झाल्यानं राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेबद्दल प्रशासनाला दोष दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी खारघर इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला धर्माधिकारी यांच्या लाखो अनुयायांची उपस्थिती होती. भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी प्रचंड उकाडा होता. या उष्माघातानं तब्बल ११ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोकांना रुग्णालयात दाखळ करावं लागलं. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना तातडीनं मदत जाहीर केली असून जखमींवरील उपचाराचा खर्च उचलला आहे. मात्र, सरकार चहूकडून टीका होत आहे.

राज ठाकरे यांनी थेट कुणावरही थेट टीका न करता प्रशासनाकडं बोट दाखवलं आहे. ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे, ते मुंबईत उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत होत्या. असं असताना इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?, असा सवाल राज यांनी केला आहे.

'सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

'सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय. अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारनं केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

IPL_Entry_Point