मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CEOP :‘स्ट्रक्चरल ऑडिट’नंतर ‘सीओईपी’च्या स्पष्टीकरणातही गोंधळ; निवेदनावरचा सही शिक्का गायब

CEOP :‘स्ट्रक्चरल ऑडिट’नंतर ‘सीओईपी’च्या स्पष्टीकरणातही गोंधळ; निवेदनावरचा सही शिक्का गायब

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 17, 2023 08:31 AM IST

Pune Metro : पुणे मेट्रो स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवरून संशयाच्या भोवऱ्यात असतांना त्यावरून विद्यापीठाने दिलेले स्पष्टीकरण वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे.

पुणे मेट्रो स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवरून संशयाच्या भोवऱ्यात असतांना त्यावरून विद्यापीठाने दिलेले स्पष्टीकरण वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे.
पुणे मेट्रो स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवरून संशयाच्या भोवऱ्यात असतांना त्यावरून विद्यापीठाने दिलेले स्पष्टीकरण वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे.

पुणे : पुणे मेट्रो स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवरून संशयाच्या भोवऱ्यात असतांना त्यावरून सीईओपीने दिलेले स्पष्टीकरण वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे. विद्यापीठाने पाठवलेल्या निवेदनावर अधिकृत शिक्का आणि कुणीचीच स्वाक्षरी नसल्याने त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यात सुरू असलेल्या महमेट्रोच्या कामत अनेक त्रुटी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या त्रुटींचे स्ट्रक्चरल ऑडिट सीईओपी मार्फत करण्यात आले. मात्र, ते देखील चुकीचे करण्यात आल्याने महामेट्रोचे अधिकारी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि स्ट्रक्चरल ऑडिट करणारे ईश्वर सोनार यांच्या विरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, सीईओपी कडून मेट्रोचे स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा करण्यात येईल अशी माहिती लेटरहेडवरून देण्यात आली. मात्र, विद्यापीठाकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण अधिकृत लेटरहेडवर नाही. या निवेदनावर कुणाचीच स्वाक्षरी अथवा शिक्का देखील नाही. निवेदनाखाली केवळ कुलसचिव लिहिले आहे, त्यात कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे यांचे नाव असणे अपेक्षित होते. मात्र, ते नाव देखील देण्यात आलेले नाही. विद्यापीठाने बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्याकडून हे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र, आता या संदर्भात खुलासा केल्यावरून देखील त्यातही गोंधळ असल्याचे पुढे आले आहे.

विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी स्नेहल हिरवे यांनी हे निवेदन पाठवले आहे. मेट्रोच्या स्ट्रक्चरल ऑडिटसारख्या गंभीर विषयावर विद्यापीठाने अधिक काळजीपूर्वक निवेदन जाहीर करणे गरजेचे असतांना, गडबडीत हे निवेदन सादर करून हे प्रकरण झाकण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना अशी चर्चा आहे.

IPL_Entry_Point

विभाग