मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hapus Mango : कोकणचो राजा इलो! देवगड हापूस मुंबईत दाखल, किंमत किती?

Hapus Mango : कोकणचो राजा इलो! देवगड हापूस मुंबईत दाखल, किंमत किती?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 22, 2024 07:32 PM IST

Hapus Mango In Market : देवगड हापूस नवी मुंबईतील बाजारात दाखल झाला आहे. हापूस पेटीची पूजा करून याची विक्री करण्यात आली. याला १२ हजाराचा दर मिळाला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

दरवर्षी कोकणातील हापूस आंब्याला बाजारात मोठी मागणी असते. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणारा हा आंबा दरवर्षी चांगलाच भाव खाऊन जातो. आंब्याचा हंगाम सुरू होताच लोक कोकणातील या राजाची आतुरतेने वाट पाहतात. यंदाच्या हंगामातील हापूसची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे. कोकण हापूसच्या पाच पेट्या आज (सोमवार) एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्या. 

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या महिन्यात एपीएमसी मार्केटमध्ये देवगडमधून पहिली पेटी दाखल झाली होती. त्यापाठोपाठ जानेवारी महिन्यात आता पाच पेट्या आल्यामुळे व्यापाऱ्यांनी हापूसचे जोरदार स्वागत केले. या पेट्यांची पूजा केल्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली. या आंब्याच्या ५ डझनच्या पेटीला १२  हजारांचा दर मिळाला. 

देवगड परीसरातील हापूसचा हंगाम सर्वात प्रथम सुरू होतो. त्यानंतर रत्नागिरी आणि अलिबागमध्ये आंबा मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होते. देवगड आणि रत्नागिरी परिसरातील आंबा बागायतदारांनी आज पाच पेट्या एपीएमसीच्या फळ बाजारात पाठवल्या. या पेट्यांची पूजा करून विक्री करण्यात आली. हंगामाची सुरूवात असल्याने पेटीला १२ हजाराचा दर मिळाला. डिसेंबर-जानेवारीत हापूसच्या पेट्या बाजारात दाखल होत असतात मात्र हापूसच्या हंगाम पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे हापूसप्रेमींना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान उद्याही देवगड हापूसच्या काही पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटबरोबर कोकणातील शेतकऱ्यांनी पुणे आणि राज्यातील अन्य बाजारपेठांमध्येही आंब्याच्या पहिल्या मुहूर्ताच्या पेट्या पाठवल्या आहेत. आज मुंबईतही हापूस दाखल झाला. मुंबईत दोन डझन आंब्याच्या पेटीची किंमत ७ हजार  ७००  रुपये इतकी होती. म्हणजेच एका आंब्याची किंमत जवळपास ३२१ रुपये एवढी झाली आहे.  सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून मार्च किंवा महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक सुरू होईल.

IPL_Entry_Point

विभाग