मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune Flight: आता वळसा नाही! पुणे ते मुंबई थेट विमानप्रवास; ‘या’ दिवशी सुरू होणार सेवा

Mumbai Pune Flight: आता वळसा नाही! पुणे ते मुंबई थेट विमानप्रवास; ‘या’ दिवशी सुरू होणार सेवा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 23, 2023 04:50 PM IST

Pune-Mumbai Flight : एअर इंडियानं पुणे आणि मुंबईला दरम्यान हवाईसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं हा देशातील सर्वांत कमी अंतराचा हवाई मार्ग ठरणार आहे.

Mumbai-Pune Air India Flight
Mumbai-Pune Air India Flight (Bloomberg)

Mumbai-Pune Air India Flight Booking : पुणे आणि मुंबई दरम्यान सातत्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता एअर इंडियानं मुंबई आणि पुणे या शहरांदरम्यान येत्या २६ मार्चपासून हवाईसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही शहरांमधील बंद असलेली हवाईसेवा पुन्हा सुरू होणार असल्यामुळं अनेक प्रवाशांना तातडीनं बुकिंग सुरू केलं आहे. याशिवाय मुंबई आणि पुणे हा केवळ १२४ किलोमीटरचा हवाईमार्ग असल्यानं तो देशातील सर्वात कमी अंतराचा मार्ग ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई ते पुणे अशा थेट हवाईसेवेची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्यानंतर आता टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडियानं येत्या २६ मार्चपासून दोन्ही शहरांदरम्यान विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता रेल्वेनं साडेतील ते चार तासांचा प्रवास विमानानं केवळ एका तासात होणार आहे. त्यानंतर आता अनेक प्रवाशांनी या विमानासाठी बुकिंग करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. यापूर्वी मुंबई आणि पुणे दरम्यान जेट एअरवेजकडून हवाई वाहतूक सुरू होती, परंतु ती काही कारणास्तव अचानक बंद करण्यात आली होती.

मुंबई ते पुणे या दोन शहरांदरम्यान वाहनांच्या वाहतुकीसाठी द्रुतगती महामार्ग आहे. याशिवाय अनेक रेल्वेगाड्या दोन्ही शहरांदरम्यान धावतात. त्यामुळं आता विमानसेवा सुरू झाल्यामुळं लोकांना काही तासांतच मुंबईहू पुणे आणि पुण्याहून मुंबईला ये-जा करता येणार आहे. शनिवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस एअर इंडियाची विमानसेवा सुरू असणार आहे. मुंबईहून पुण्यासाठी सकाळी पहिलं विमान हे ९.४५ मिनिटांनी असणार आहे. पुण्याहून मुंबईसाठी ११.२० मिनिटांनी विमान असेल. सकाळच्या वेळी प्रवासाठी विमानं उपलब्ध असली तरी रात्री परतणाऱ्या लोकांसाठी विमान उपलब्ध नसल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.

IPL_Entry_Point