मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Delisle Bridge : मुंबईच्या डिलाईल रोडवरील पुलाबाबत मोठी अपडेट, वाहतुकीसाठी लवकरच होणार खुला

Delisle Bridge : मुंबईच्या डिलाईल रोडवरील पुलाबाबत मोठी अपडेट, वाहतुकीसाठी लवकरच होणार खुला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 23, 2023 03:26 PM IST

Delisle Bridge Mumbai : डिलाईल रोडवरील पूल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. मात्र आता या पुलाचं काम जारी असून लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Delisle Bridge Mumbai
Delisle Bridge Mumbai (HT)

Delisle Bridge Mumbai : राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला दक्षिण मुंबईतील डिलाईल रोडवरील पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाचं काम सुरू असतानाचा त्याची नवी डेडलाईन देण्यात आली आहे. त्यानुसार डिलाईल रोडवरील पूल हा येत्या ऑक्टोबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता मुंबईच्या विविध भागातून लोअर परळमध्ये येणाऱ्या लोकांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयआयटी मुंबईच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या मंडळानं ऑगस्ट २०१८ साली या पुलाला धोकादायक घोषित केलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून नव्या पुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं. रेल्वे रुळांचा भाग पाडण्यात आल्यानंतर मार्ग आणि रॅम्प उभारणीचे काम सुरू करण्यात आलं आहे. त्यानंतर आता इतर कामं पूर्ण झाल्यानंतर येत्या ऑक्टोबरपासून या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

पुलाच्या डेडलाईनमध्ये अनेकदा बदल...

रेल्वे आणि महापालिकेच्या वतीनं बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाच्या डेडलाईनमध्ये यापूर्वी अनेकदा बदल करण्यात आले होते. पहिल्यांदा हा पूल डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पूल मे २०२३ मध्ये पूर्ण करण्यात येईल, असं पालिकेकडून सांगण्यात आलं होतं. परंतु आता पुन्हा डेडलाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या विविध भागांमधून लोअर परळच्या दिशेनं येणारे कामगार, नोकरदार आणि चाकरमान्यासाठी डिलाईल रोडवरील पूल लाईफलाईन मानला जातो. त्यामुळं आता त्याचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्यानं आनंद व्यक्त केला जात आहे.

IPL_Entry_Point