मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra politics : भाजपमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर.. राम शिंदे यांचा विखे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप

Maharashtra politics : भाजपमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर.. राम शिंदे यांचा विखे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 16, 2023 11:40 PM IST

ram shinde serious allegations on vikhe patil : नगरचेपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीत पक्षाविरोधी काम केल्याचा थेट आरोप राम शिंदेंनी केला आहे.

राम शिंदे यांचा विखे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
राम शिंदे यांचा विखे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप

अहमदनगर – सुजय विखे यांच्या लोकसभा मतदारसंघातून राम शिंदे यांना उमेदवारी देण्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू होत्या. आत या दोन नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून राम शिंदे आणि विखे पाटील या दोन भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषद निवडणुकीपासून राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यातील सुप्त वाद आता समोर आला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीत पक्षाविरोधी काम केल्याचा थेट आरोप राम शिंदेंनी केला आहे. एवढंच नाही तर खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची छुपी युती असल्याचा खळबळजनक आरोप राम शिंदेंनी केला आहे. याचा आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल सोपवणार असल्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. येणाऱ्या काळात अहमदनगरमध्ये शिंदे विरूद्ध विखे असा सामान रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 

राम शिंदे यांनी म्हटले आहे की, जामखेड बाजार समितीचे सभापतीपद आमच्याकडे येईल असा विश्वास होता, मात्र राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी पक्षाच्या  विरोधात काम केले. या गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्या असून याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल. विधानसभेतही विखेंनी विरोधात काम केलं होतं, आताही विरोधात काम केलं, असल्याचा गौप्यस्फोट राम शिंदे यांनी केला आहे. एवढच नाही तर आमचा पक्ष भाजप आहे, काँग्रेस नाही, असा टोलाही राम शिंदे यांनी लगावला आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप यांना ९-९ अशा समसमान जागा मिळाल्याने या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणखी चुरस वाढली होती. कुणाचाही सदस्य न फुटल्याने पुन्हा समान सदस्य झाले. त्यानंतर चिठ्ठीने भाजपाचा सभापती तर राष्ट्रवादीचे उपसभापती झाले.

IPL_Entry_Point