मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  देवदर्शनावरून येताना काळाचा घाला! अहमदनगर येथील भीषण अपघातात चार ठार, ११ जखमी

देवदर्शनावरून येताना काळाचा घाला! अहमदनगर येथील भीषण अपघातात चार ठार, ११ जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 23, 2023 12:40 PM IST

अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात भरधाव ट्रकने भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक दिली.

Two Wheeler Accident Kandhar Nanded
Two Wheeler Accident Kandhar Nanded (HT)

Ahamednagar Road Accident: अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात ट्रक आणि टम्पोच्या धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पोमधील प्रवासी देवदर्शन करून आपल्या गावाकडे निघाले असताना हा अपघात घडला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिरूर तालुक्यातील आमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील १६ जण गुढीपाडव्याच्या निमित्ताने शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यासाठी त्यांनी टेम्पो केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर आणि देवगड येथील देवाचे दर्शन घेतल्यानंतर ते आपल्या गावाकडे निघाले. मात्र, नगर-पुणे महामार्गावर कामगारगावजवळ पुण्याकडून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या टेम्पोला धडक दिली. या घडकेत राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे यांचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नंतर पोलीसही मदतीला धावले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात चार जण ठार झाले असून त्यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक टेम्पोवर येऊन आदळल्याचे सांगण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग