मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्रींचा कार अपघातात कसा झाला मृत्यू?, मर्सिडीज कंपनीचा मोठा खुलासा!

Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्रींचा कार अपघातात कसा झाला मृत्यू?, मर्सिडीज कंपनीचा मोठा खुलासा!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 07, 2022 12:11 PM IST

cyrus mistry death in car accident : टाटा उद्योग समूहाचे माजी चेयरमन आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर आता मर्सिडीज कंपनीनं या अपघाताबाबत पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

cyrus mistry death in car accident
cyrus mistry death in car accident (HT)

cyrus mistry death in car accident : अहमदाबादहून मुंबईत येत असताना पालघरजवळ झालेल्या कार अपघातात टाटा समूहाचे माजी चेयरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं निधन झालं होतं. सायरस यांच्याकडे मर्सिडीज कार होती, त्याच कारच्या अपघात झाला होता. अपघात का झाला किंवा त्यामागं कोणती कारणं होती?, हे आता पोलिसांच्या तपासात समोर आलेलं असतानाच आता मर्सिडीज कंपनीनं याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, मर्सिडीज बेंझ इंडियानं याबाबत खुलासा करताना म्हटलंय की, सायरस मिस्त्री यांच्या मृत्यू प्रकरणातील चौकशी आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत. ग्राहकांच्या प्रायव्हसीचं सन्मान करणारी जबाबदार कंपनी असल्यानं आम्ही पोलीस तपासात सहकार्य करणार आहोत, याशिवाय गरज पडल्यास तपास अधिकाऱ्यांना आवश्यक माहितीही शेयर करू, असं कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

कारमधील सुरक्षा आणखी वाढवू- मर्सिडीज

कंपनीच्या कारला आणखी सुरक्षित करण्यासाठी लेटेस्ट सेफ्टी आणि टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे, याशिवाय अपघाताबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पावलं उचलली जाणार असल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे.

मिस्त्रींच्या अपघातामुळं कंपनीनं व्यक्त केला शोक...

या दुर्घटनापूर्ण घटनेत उद्योगपती सायरस मिस्त्रींसह आणि जहांगीर पांडोळे यांचं निधन झाल्यामुळं मर्सिडीज कंपनीनं दुख: व्यक्त केलं आहे. याशिवाय डॉक्टर अनाहिता पांडोळे आणि डेरियस पांडोळे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही मर्सिडीज कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात केली आहे.

अपघाताचं नेमकं कारण काय, याचा शोध घेतला जाणार...

मर्सिडीज कंपनीनं सायरस मिस्त्री यांच्या अपघातामागची कारणं शोधायला सुरुवात केली आहे. त्यासाठी कंपनीच्या विशेष पथकानं याआधी झालेल्या मर्सिडीजच्या अपघातांच्या घटनांची माहिती गोळा करायचं काम सुरू केलं आहे. त्यामुळं आता मिस्त्री यांच्या अपघातामागे कोणती नेमकी कारणं आहेत, याचा शोध मर्सिडीज कंपनीतर्फे घेतला जाणार आहे.

ज्या कारला अपघात झालेला आहे, त्याच्या टायरमधील हवेचं प्रमाण आणि ब्रेकच्या फ्लूडचा स्तर तपासल्यानंतरच हा अपघात नेमका का झाला होता, याचा अंदाज लावता येईल, असं पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी सांगितलं आहे. मिस्त्री यांची कार भरधाव वेगात होती, कारनं नऊ मिनिटांत २० किमीचं अंतर कापलेलं होतं. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कारमध्ये मागच्या सीटवर बसेलल्या मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता, असं पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलेलं आहे.

रविवारी दुपारी पालघरनजीकच्या सूर्या नदीच्या पुलाजवळ झालेल्या कार अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांचा मित्र जहांगीर पांडोळेंचा मृत्यू झाला होता. याशिवाय प्रसिद्ध स्त्रिरोगतज्ज्ञ अनाहिता पांडोळे या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. अपघातग्रस्त कार ही मर्सिडीजच्या जीएलसी २२० मॉडेलची होती.

IPL_Entry_Point

विभाग