मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident : मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; टेम्पो आणि बसची धडक, टेम्पो चालक ठार

Mumbai Accident : मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; टेम्पो आणि बसची धडक, टेम्पो चालक ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2023 09:50 AM IST

Mumbai Accident : मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टेम्पो आणि बसची धडक झाल्याने टेम्पो चालक ठार झाला आहे. या घटनेनंतर बस चालक फरार झाला आहे.

Mumbai Accident
Mumbai Accident

मुंबई : मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावरील वाकोला ब्रिजवर मध्यरात्री भीषण अपघात झाला. टेम्पो आणि बसमध्ये धडक झाली असून या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला आहे. या घटनेत काही जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर बस चालक हा फरार झाला आहे. अपघात झाला तेव्हा बसमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे परदेशी कर्मचारी होते. ते ताज लॅण्ड्ल एंड हॉटेलमध्ये जात होते.

ट्रेंडिंग न्यूज

मध्यरात्री १.३० च्या सुमारास मासे घेऊन जाणारा टेम्पो हा वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गाने जात होता. यावेळी, कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे कर्मचारी एका मर्सिडिज बेन्सच्या बसमधून हॉटेल ताज लॅण्ड्स एंडमध्ये जात होते. यावेळी बस वाकोला ब्रिजवर येताच टेम्पो आणि बसमध्ये जोरधार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की बस आणि टेम्पोचा चक्काचूर झाला.

या घटनेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बस मधील काही प्रवासी हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर मासे रस्त्यावर पडले. यामुळे रस्ता देखील निसरडा झाला होता. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले.

त्यांनी येथील वाहतूक सुरुळीत केली. तसेच बसमधील कर्मचाऱ्यांची विचारपूस करत होते. दरम्यान, बसचालक हा फरार झाला आहे. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बसमधील सर्व कर्मचारी परदेशी नागरिक आहे आणि सर्व जण सुरक्षित आहे. अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला हे समजू शकले नाही.

IPL_Entry_Point

विभाग