मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले ‘..हा तब्बल १० हजार कोटींचा घोटाळा'

आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले ‘..हा तब्बल १० हजार कोटींचा घोटाळा'

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 15, 2023 07:53 PM IST

Metro Car Shed Kanjur Marg Scam : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधून यामध्ये १० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद पुन्हा उफाळला आहे. आदित्य ठाकरे यांनी कांजुरमार्गमधील जागेबद्दल नवीन खुलासा केला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधून यामध्ये १० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की, हा घोटाळा खूप मोठा आहे. ज्या मुंबईचे १० हजार कोटी रुपये वाचणार होते,कारण एक डेपो होणार होता. आरे जंगल वाचणार होतं, हे सगळं न करता, १० हजार कोटी खर्च केले जात आहेत. अनेक कंत्राट बोलावले जात आहे. मार्ग ३ आणि ६ हे कांजुरमार्गला नेला आहे. १४ मेट्रोची लाईनही कल्याण-अंबरनाथला जोडणार आहे. सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यामध्ये किती हात आहे हे आम्हाला माहिती नाही. पण, हे कारशेडचे डेपो होणार आहे, त्यासाठी जमिनी कुणाच्या असणार आहे, मध्यस्थ कोण असणार आहे, कुणाच्या नावावर सातबारे आहे, कुणाचा मतदारसंघ आहे, कंत्राट कुणाला दिले जाणार आहे, असा सवालही आदित्य ठाकरेंनी केली.

 

कांजुरमार्गमधील १५ हेक्टर जागा देत असताना कुणाला अनुदान देणार आहात? या ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रोला वापरणार आहे, तर उरलेली जागा कुणाला दिली जाणार आहे, बिल्डरांना दिली जाणार आहे, यावर नक्की काय होणार आहे, हा एक मोठा घोटाळा आहे, यावर मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

IPL_Entry_Point