मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: गुडघेदुखीच्या समस्येने हैराण? नियमित करा हे योगासन, मिळेल आराम

Yoga Mantra: गुडघेदुखीच्या समस्येने हैराण? नियमित करा हे योगासन, मिळेल आराम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 07, 2023 09:02 AM IST

गुडघेदुखीच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी योगासन हे प्रभावी उपाय आहे. योगा केल्याने पायाचे रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो. पहा कोणते आसनं करावी.

गरुडासन
गरुडासन (freepik)

Yogasana for Knee Pain: आजकाल गुडघेदुखीचा त्रास सामान्य झाला आहे. वाढत्या वयात गुडघे दुखणे नवीन नाही. पण आता अनेकांना कमी वयात देखील गुडघेदुखी होते. यामागे शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे किंवा जास्त ऑइली खाणे अशी अनेक कारणे असू शकतात. जर तुम्ही देखील गुडघेदुखीने त्रस्त असाल तर योग तुम्हाला मदत करू शकतो. योगा केल्याने पायाचे ब्लड सर्कुलेशन सोबतच गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो. चला जाणून घेऊया कोणत्या ३ योगासनांमुळे गुडघेदुखीपासून सुटका मिळू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

गरुडासन

गुडघे मजबूत करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी जमिनीवर सरळ उभे राहा. यानंतर उजवा गुडघा वाकवून डाव्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. नंतर उजवा पाय डावीकडे वळवून मागे घ्या. या दरम्यान उजवी मांडी डावीकडे ठेवा. या आसनात दोन्ही हात पुढे करा. दोन्ही हातांच्या कोपरांना वाकवून क्रॉस करा. हातांना क्रॉस करताना उजवा हात डावीकडे ठेवा.

त्रिकोनासन

त्रिकोनासन केल्याने स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहावे. हे करत असताना गुडघे वाकवू नका, सरळ उभे रहा. पायांमध्ये सुमारे दोन फूट अंतर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि शरीर उजवीकडे वाकवा. वरीलप्रमाणे डावा हात कानाला लावा. डाव्या हाताच्या बोटांवर डोळे फिक्स करा. काही सेकंद असेच राहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सामान्य स्थितीत या. दुसऱ्या बाजूने ही प्रक्रिया पुन्हा करा.

मकरासन

मकरासन केल्याने पायांच्या स्नायूंना खूप ताकद मिळते. त्यामुळे गुडघेदुखी मध्ये व्यक्तीला खूप आराम मिळतो. हे नेहमी रिकाम्या पोटी करा. लक्षात ठेवा की हे किमान पाच मिनिटे सुमारे १० वेळा करा आणि हे दिवसातून किमान २ वेळा करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग