मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: शरीर ठेवायचंय डिटॉक्स तर या योगासनांनी करा दिवसाची सुरुवात

Yoga Mantra: शरीर ठेवायचंय डिटॉक्स तर या योगासनांनी करा दिवसाची सुरुवात

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 08, 2023 08:17 AM IST

Yoga for Detoxification: पाणी आणि इतर पदार्थांव्यतिरिक्त योगासने शरीरात साचलेले टॉक्सिन्स काढून टाकण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. शरीर डिटॉक्स ठेवण्यासाठी या योगासनांनी दिवसाची सुरुवात करा.

अधोमुख श्वानासन
अधोमुख श्वानासन (unsplash)

Yoga Poses to Detox Body: शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खाण्या-पिण्याची काळजी घेण्यासोबतच स्वत:ला डिटॉक्स करणे देखील आवश्यक आहे. डिटॉक्स फूड आणि ड्रिंक्स व्यतिरिक्त, आपण शरीरात जमा झालेल्या विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यासाठी सोप्या योगासनांची मदत देखील घेऊ शकता. स्वतःला तंदुरुस्त आणि उत्साही ठेवण्यासाठी या योगासनांचा अवश्य अवलंब करा.

ट्रेंडिंग न्यूज

Yoga Mantra: प्रजनन क्षमतेच्या समस्येत कपलने करावी ही योगासनं, सहज होईल गर्भधारणा

१. अधोमुख श्वानासन

सूर्यनमस्काराच्या सात आसनांपैकी एक आसन म्हणजे अधोमुख श्वानासन आहे. हे करण्यासाठी आपले शरीर पुढे वाकते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने सुरू होते. या योगामुळे शरीराचे अनेक भाग ताणले जातात. हा योग स्ट्रेचिंग व्यायामामध्ये गणला जातो. हे करण्यासाठी प्रथम चटईवर सरळ उभे रहा. यानंतर दोन्ही हात वरच्या दिशेने न्या आणि आणि हात सरळ करा. आता शरीराला पुढे वाकवा आणि गुडघे वाकवताना दोन्ही हात जमिनीवर ठेवा. दोन्ही हात आणि दोन्ही पाय यामध्ये अंतर असणे आवश्यक आहे. हा योग करत असताना टाच उचलण्याचा प्रयत्न करा.

Yoga Mantra: उन्हाळ्यात शरीर ठेवायचंय थंड तर मदत करतील ही ३ योगासनं, पाहा करण्याची योग्य पद्धत

२. भारद्वाजासन

या आसनामुळे शरीराची लवचिकता वाढू लागते. त्याच्या नियमित प्रयत्नाने शरीर केवळ डिटॉक्सच नाही तर तंदुरुस्त राहते. या आसनाचे वैशिष्ट्य म्हणजे याने शरीरातील स्नायू ताणले जातात आणि अनेक आजार दूर होतात. हे आसन करण्यासाठी तुम्ही चटईवर बसा. त्यानंतर सुखासनाच्या आसनात बसा आणि डोळे बंद करा. आता उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला स्पर्श करा. त्याच वेळी, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला ३० सेकंद ते एक मिनिट या आसनात राहण्याचा प्रयत्न करा. एकदा केल्यावर आता दुसऱ्यांदा डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला स्पर्श करा. हा योग करताना मान मागे वाकवा.

Yoga Mantra: पाइल्सपासून सुटका करतील ही आसनं, वेदनेपासूनही मिळेल आराम

३. नौकासन

बॉडी डिटॉक्स ठेवण्यासाठी, तुमच्या दिनचर्येत नौकासनाचा समावेश करा. हे स्नायू पेटके आणि पाय दुखण्यापासून देखील आराम देऊ शकते. हे करण्यासाठी चटईवर सरळ झोपा. यानंतर दोन्ही हात पायांना जोडा. आता हळू हळू वर उठा आणि हात सरळ करा. यानंतर दोन्ही पाय वरच्या बाजूला करा. लक्षात ठेवा की पाय पूर्णपणे सरळ असावेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग