मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: उन्हाळ्यात शरीर ठेवायचंय थंड तर मदत करतील ही ३ योगासनं, पाहा करण्याची योग्य पद्धत

Yoga Mantra: उन्हाळ्यात शरीर ठेवायचंय थंड तर मदत करतील ही ३ योगासनं, पाहा करण्याची योग्य पद्धत

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 06, 2023 08:29 AM IST

Yoga For Summer: तुम्हाला माहिती आहे का, योग करून तुम्ही उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवू शकता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. चला जाणून घेऊया अशा ३ योगासनांविषयी, जे उन्हाळ्यात तुम्हाला कुल ठेवतील.

पादहस्तासन
पादहस्तासन (freepik)

Yoga Asanas to Stay Cool: लठ्ठपणा दूर करून शरीराला एक परिपूर्ण आकार देणे असो किंवा आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवणे, योगासने हे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. फक्त शारीरिक, मानसिक स्वास्थ्यच नाही तर योग करून तुम्ही उन्हाळ्यातही स्वतःला थंड ठेवू शकता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. चला जाणून घेऊया अशा ३ योगासनांविषयी, जे उन्हाळ्यात रोज केल्याने तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकता. ही योगासने उन्हाळ्यात मन शांत ठेवण्यास आणि शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

Yoga Mantra: पाइल्सपासून सुटका करतील ही आसनं, वेदनेपासूनही मिळेल आराम

शवासन

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी शवासन हा एक चांगला उपाय आहे. या आसनाचा सराव करण्यासाठी सर्वप्रथम चटईवर झोपून हात, पाय आणि कंबर सरळ ठेवा. यानंतर, डोळे बंद करा आणि १५ मिनिटे रिलॅक्स करा. हे करताना झोप लागत नाही हे लक्षात ठेवा. असे केल्याने रक्ताभिसरण वाढण्यासोबतच शरीराला थंडावा मिळतो आणि मन शांत राहते.

Yoga Mantra: थायरॉईडची समस्या दूर करण्यास मदत करतील हे योगासन, दररोज करा सराव

पादहस्तासन

पादहस्तासन केल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच हृदयही निरोगी राहते. या आसनामुळे पोटाची उष्णता शांत होऊन तणावही दूर होतो. पादहस्तासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर सरळ उभे राहून दोन्ही हात हिप्सवर ठेवा. आता श्वास घेताना गुडघे सैल सोडा. आता कंबर वाकवून, पुढे वाका. हे करताना शरीराचा समतोल राखावा. हिप्स आणि टेलबोन किंचित मागे घ्या आणि हळू हळू हिप्स वरच्या बाजूस उचला आणि वरच्या मांड्यांवर दाब आणण्याचा प्रयत्न करा. यानंतर हात पायाखाली दाबून पाय एकमेकांना समांतर ठेवा. हे करत असताना, तुमची छाती पायाच्या वरच्या भागाला स्पर्श करत असावी. छातीची हाडे आणि प्युबिस यांच्यामध्ये विस्तृत जागा ठेवा. मांड्या आतून दाबा आणि टाचांवर शरीर स्थिर ठेवा. डोके खाली वाकवा आणि पायांमधून पहात रहा. १५-३० सेकंद या स्थितीत स्थिर रहा. स्थिती सोडताना ओटीपोट आणि खालच्या अंगांना संकुचित करा. श्वास आत घ्या आणि हात हिप्सवर ठेवा. हळू हळू वर जा आणि सरळ उभे रहा.

Yoga Mantra: दम्याच्या रुग्णांनी रोज करावी ही ३ आसनं, श्वासोच्छवासाच्या समस्या होतील दूर

सिंहासन

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही सिंहासन देखील करू शकता. ही एक अतिशय सोपी पोझ आहे. परंतु हे आसन सकाळी रिकाम्या पोटी करण्याचा सल्ला दिला जातो. सिंहासन तणाव दूर करून ब्लड सर्कुलेशन सुधारते. सिंहासन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसून पाठीचा कणा आणि कंबर एकदम सरळ ठेवा. यानंतर दोन्ही तळवे गुडघ्यावर ठेऊन 'हा' असा आवाज करत दीर्घश्वास घ्या आणि श्वास सोडा. ही प्रक्रिया ५ वेळा पुन्हा करा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग