मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: प्रजनन क्षमतेच्या समस्येत कपलने करावी ही योगासनं, सहज होईल गर्भधारणा

Yoga Mantra: प्रजनन क्षमतेच्या समस्येत कपलने करावी ही योगासनं, सहज होईल गर्भधारणा

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 07, 2023 09:01 AM IST

Yoga to Conceive: अनेक कारणांमुळे हल्ली बऱ्याच महिला आणि पुरुष प्रजनन क्षमतेच्या समस्येला सामोरे जात आहेत. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कपल काही योगासन करू शकतात.

कपल योगासन
कपल योगासन (Freepik)

Yoga Asanas to Boost Fertility: आजकाल कपल्सला लग्नानंतर मूल होण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातील सर्वात प्रमुख म्हणजे फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमतेची समस्या. होय, बहुतेक महिला आणि पुरुषांना प्रजनन क्षमतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. यापासून मुक्त होण्यासाठी योगासने सहज मदत करू शकतात. योग तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी फायदेशीर आहे. अशा वेळी तुम्ही ते दररोज केले पाहिजे. वंध्यत्व पुरुष आणि स्त्रियांच्या शरीरावर, भावनांवर आणि नातेसंबंधांवर परिणाम करते. अशा परिस्थितीत योगा करणे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहे. येथे काही योगासने आणि त्यांचे फायदे आहेत, ज्यामुळे प्रजनन क्षमता सुधारू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

Yoga Mantra: उन्हाळ्यात शरीर ठेवायचंय थंड तर मदत करतील ही ३ योगासनं, पाहा करण्याची योग्य पद्धत

पुरुष आणि स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता वाढवणारी योगासन

सूर्यनमस्कार

हे योग आसन मासिक पाळीच्या क्रॅम्प्सच्या व्यवस्थापनासाठी खूप प्रसिद्ध आहे. हे रजोनिवृत्ती दरम्यान देखील उपयुक्त आहे. त्याचा परिणाम स्त्रीच्या गर्भाशयावर होत असल्याने सूर्यनमस्कार योग बाळंतपण सुलभ होण्यास मदत करतो. हे शरीराचे लैंगिक कार्य देखील सुधारते. हे लैंगिक ग्रंथींच्या बिघडण्याशी संबंधित कोणतीही समस्या दूर करते.

पश्चिमोत्तनासन

हे आसन तुमच्या पाठीच्या खालच्या बाजूचे, नितंबांचे आणि हॅमस्ट्रिंगचे स्नायू ताणते. हे स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता सुधारते. कारण ते अंडाशय आणि पोट यासारख्या महत्त्वपूर्ण अवयवांना सक्रिय करते आणि मानसिक ताण कमी करते.

Yoga Mantra: पाइल्सपासून सुटका करतील ही आसनं, वेदनेपासूनही मिळेल आराम

जानुशिर्षासन

हे योगासन केवळ गर्भधारणेसाठी आवश्यक नाही तर गर्भधारणे दरम्यान देखील फायदेशीर ठरू शकते. हे पोटाच्या स्नायूंना आराम देताना हॅमस्ट्रिंग्स ताणते.

बटरफ्लाय पोझ

तुमच्या आतील मांड्या, गुप्तांग, नितंब क्षेत्र आणि गुडघे यांच्या स्नायूंना ताणताना ते लवचिकता सुधारते. हा अधिक उपयुक्त प्रजनन योग व्यायामांपैकी एक आहे आणि वेळ आल्यावर सहज आणि कमी वेदनादायक प्रसूतीमध्ये देखील मदत करू शकतो.

Yoga Mantra: थायरॉईडची समस्या दूर करण्यास मदत करतील हे योगासन, दररोज करा सराव

बालासन

हे आसन ताणतणाव दूर करते आणि रक्त प्रवाह वाढवते. याशिवाय, हेआसन तुमच्या पाठीचे, गुडघे, नितंब आणि मांडीचे स्नायू स्ट्रेच करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग