मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: हिवाळ्यात सकाळी उठायला नको वाटते? मग बेडवर झोपूनच करा 'हे' योगासन

Yoga Mantra: हिवाळ्यात सकाळी उठायला नको वाटते? मग बेडवर झोपूनच करा 'हे' योगासन

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 14, 2023 08:17 AM IST

हिवाळ्यात सकाळी लवकर उठून एक्सरसाईज करणे म्हणजे अनेकांना आव्हान वाटते. तुम्हालाही सकाळी उठण्याचा कंटाळा येत असेल तर आधी हे योगासन पहा. हे तुम्ही तुमच्या बेडवर झोपून करु शकता. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घ्या हे योगासन.

जानू शीर्षासन
जानू शीर्षासन

Yoga in Bed: आरोग्यासाठी योगा उत्तम असल्याचे माहित असूनही अनेक लोक ते करायचा टाळतात. कारण ते सकाळी उठून करावे लागते आणि त्यांना हिवाळ्यात सकाळी उठण्याचा कंटाळा येतो. आता आळसामुळे तुम्ही कोणताही व्यायाम करत नाही आणि अशा स्थितीत लठ्ठपणा, स्नायू घट्ट होणे, कमी सक्रिय राहणे अशा समस्या उद्भवू शकतात. येथे आम्ही ४ योगासन सांगत आहोत, जे तुम्ही बेडवर झोपून सहज करू शकता. असे केल्याने पाठदुखीची समस्या कमी होते आणि अनेक फायदे मिळतात. येथे सोप्या पद्धतीने करता येतील बेड योगासन आहे.

ट्रेंडिंग न्यूज

१) बटरफ्लाय पोझ

योगामध्ये ही सर्वात सोपी आणि आरामदायक पोझ आहे. असे केल्याने पाठदुखी आणि खांदेदुखीपासून आराम मिळतो. याशिवाय थाई स्नायूंना लवचिक बनवण्यास मदत होते. हृदय, अंडाशय, उदर अवयवांना उत्तेजित करते आणि थकवा कमी करते. हे करण्यासाठी सरळ बसा, आपले गुडघे वाकवा आणि आपले पाय शक्य तितक्या गुप्तांगांच्या जवळ आणा. तळवे एकमेकांना स्पर्श करतात याची खात्री करा, पाय हातात घट्ट धरून ठेवा आणि गुडघे हलवा.

२) जानु शीर्षासन

या आसनात कपाळाने गुडघ्याला स्पर्श करावा लागतो. असे केल्याने पाठीच्या वरच्या बाजूचे दुखणे दूर होण्यास मदत होते. हे मासिक पाळी सामान्य करण्यासाठी देखील चांगले आहे. पाठदुखी, तणाव कमी करण्यास मदत करते आणि तुमची सकाळ फ्रेश बनवते. हे करण्यासाठी आधी सरळ बसून एक पाय वाकवून दुसरा पाय पसरवा. आता पुढे वाकून तळव्याकडे हात पसरवा आणि दोन्ही हातांनी धरा. हे करत असताना आपल्या कपाळाने गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. २ मिनिटे या स्थितीत रहा आणि सरळ बसा. आता दुसऱ्या पायाने तेच करा.

३) विपरीत करनी

हे आसन केल्याने लवचिकता आणि स्नायूंचा टोन वाढण्यास मदत होते. हे पाठदुखी आणि स्नायूचे दुखने कमी करण्यास मदत करते. हे करण्यासाठी पाठीवर झोपा आणि हवेत पाय आणि पाठ सरळ करून शरीर वर करा. आपण आपल्या हातांनी किंवा भिंतीच्या मदतीने शरीराला आधार देऊ शकता.

४) परिवृत्त सुखासन

हे आसन पाठदुखी कमी करण्यासाठी आणि ओटीपोटाच्या स्नायूंना उत्तेजित करण्यास मदत करते, चिंता दूर करते, वैरिकास नसा आणि मन शांत करते. हे करण्यासाठी पाय पसरून सरळ बसा. मग तुमचा एक गुडघा उचला, शरीराचा वरचा भाग गुडघ्याच्या दिशेने वाकवा, तुमचे विरुद्ध कोपर गुडघ्याला चिकटवा जेणेकरून तुमच्या वाकण्याला आधार मिळेल. आराम करा आणि पुन्हा करा.

टीप - पलंगावर योगा करताना गादी योग्य असणे गरजेचे आहे. जर गादी मऊ असेल तर आसन चुकू शकतो आणि समस्या वाढू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग