मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: बदलत्या वातावरणात ठेवायचंय स्वतःला उत्साही? ट्राय करा हे योगासन

Yoga Mantra: बदलत्या वातावरणात ठेवायचंय स्वतःला उत्साही? ट्राय करा हे योगासन

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 10, 2023 08:19 AM IST

Best Yoga for Changing Weather: हवामान बदलले की त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. शरीराला उष्णता आणि सामान्य आजारांशी लढण्यासाठी तग धरण्याची क्षमता देण्यासाठी योगासन मदत करतात. याशिवाय यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल.

योगासन
योगासन

Yogasanas to Keep Yourself Energetic: योग म्हणजे शरीर, मन आणि ऊर्जा, सामर्थ्य आणि सौंदर्य यांचे मिलन. बदलत्या ऋतूमध्ये आळशीपणा, कमी ऊर्जा, स्नायू ताठरणे आणि सांधे दुखणे अशा अनेक गोष्टींचा अनुभव येतो. पण हे सुद्धा सत्य आहे की, या ऋतूत शरीराची नैसर्गिक तग धरण्याची क्षमता आणि ताकद उच्च पातळीवर असते. त्यामुळे आपल्या रुटीनमध्ये योगाचा समावेश करा. दैनंदिन जीवनात, ते केवळ प्रतिकारशक्ती आणि उर्जा वाढवणार नाही तर मूड देखील सुधारेल आणि शरीराला मौसमी रोग आणि इतर आरोग्य समस्यांपासून बचाव करण्यासाठी शक्ती देईल.

ट्रेंडिंग न्यूज

बदलत्या वातावरणात करा हे योगासन

नौली क्रिया - हे केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. चयापचय वाढते आणि रक्तदाब नियंत्रित होते, ज्यामुळे मधुमेह दूर राहतो.

कपालभाती - हे आसन थंड हंगामात कफ आणि शिळी हवा साफ करण्यासाठी खूप चांगले आहे.

भस्त्रिका - डायाफ्राम हलवल्याने शरीराचे तापमान वाढते.

सूर्यनमस्कार - हे मानसिक स्पष्टता, शारीरिक नियंत्रण, ऊर्जा आणि जागरूकता वाढवते.

सेतुबंधासन - हे आसन तुमच्या भावना शांत करण्यासाठी आणि उत्थान करण्यासाठी तसेच तुमच्या पोटावरील चरबी वितळवण्यासाठी चांगले आहे.

पश्चिमोत्तनासन - वृद्ध लोकांना खूप आवडणारे आसन आहे. कारण त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत आणि पाठदुखीपासून आराम मिळतो.

उष्ट्रासन - हे श्वासोच्छवास राखण्यासाठी आणि स्नायू तयार करण्यात मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग