मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Til Laddu Health Benefits: तिळाचे लाडू असतात जीवनसत्त्वांनी भरलेले, हे ५ आजार होतात बरे!

Til Laddu Health Benefits: तिळाचे लाडू असतात जीवनसत्त्वांनी भरलेले, हे ५ आजार होतात बरे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 14, 2023 11:57 AM IST

Nutrients in Til Ke Laddu: तीळ आणि गूळ घालून तयार केलेले लाडू हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्याचे काम करतात.

 तिळाचे लाडू
तिळाचे लाडू (Freepik )

Makar Sankranti: मकर संक्रांती आणि भोगी सारखे प्रसंग देखील खाद्यपदार्थांच्या माध्यमातून साजरे केले जातात. आजही, भारतातील बहुतेक घरांमध्ये, लोक सणासुदीच्या काळात पारंपारिक पद्धतीने तिल के लाडू, दही-चुडा आणि खिचडी यासारख्या गोष्टी बनवतात आणि खातात. तिळाचे लाडू हे कोणत्याही आरोग्यदायी अन्नापेक्षा कमी नाही, कारण त्यात अनेक जीवनसत्त्वे असतात. आजींच्या काळापासून हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. तीळ आणि गूळ घालून तयार केलेले लाडू हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्याचे काम करतात. शरीराला बरे करण्यासोबतच तिळापासून शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या हिवाळ्यात तीळ का खावेत आणि त्याचे फायदे काय आहेत…

पोषकतत्व

तिळात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन बी आणि ई आढळतात. हे सर्व घटक आपल्या शरीरातील अविभाज्य भाग जसे की डोळे, यकृत आणि इतरांसाठी फायदेशीर आहेत. तुम्ही काळ्या किंवा पांढर्‍या तीळाचे लाडू तयार करू शकता. तीळ हे हेल्दी सुपरफूड आहे आणि या कारणास्तव लोक ते तेल काढल्यानंतरही खातात. त्याचबरोबर यामध्ये वापरण्यात येणाऱ्या गुळामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकसतात आणि गूळ त्या उघडतो आणि रक्तप्रवाह सुधारतो. कमी उष्मांक असलेले अन्न असल्याने वजन कमी होऊ शकते.

हे ५ आजार किंवा आरोग्य समस्या होतील दूर

१. हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि आपल्याला खोकला आणि सर्दीपासून सुरक्षित ठेवतात.

२. कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या दुखण्याचा त्रास होत नाही.

३. ज्यांना बद्धकोष्ठतासारखे पोटाचे आजार आहेत त्यांनी हिवाळ्यात तीळ खाणे आवश्यक आहे, कारण त्यात फायबर देखील असते.

४. दिल्लीचे वरिष्ठ डॉ. अजय कुमार म्हणतात की ते ऊर्जा देण्यासाठी प्रभावी आहे आणि दम्याच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.

५. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका अधिक येतात. अशा परिस्थितीत तिळाचे सेवन केले पाहिजे कारण त्यातील घटक आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतात

WhatsApp channel