मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Benefits of Bhogichi Bhaji: न खाई भोगी तो सदा रोगी! जाणून घ्या भोगीची भाजी खाण्याचे फायदे

Health Benefits of Bhogichi Bhaji: न खाई भोगी तो सदा रोगी! जाणून घ्या भोगीची भाजी खाण्याचे फायदे

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 14, 2023 10:01 AM IST

Makar Sankranti Special: मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा खास बेत आणखा जातो.

भोगीची भाजी
भोगीची भाजी (Pinterest)

Winter Health Care: वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगीची भाजी आवर्जून बनवली जाते. मकर संक्रांतीला 'तिळगूळ घ्या, गोड बोला' असं बोलत वाटले जाणारे तिळगुळाचे महत्त्वं तर अनेकांना माहित आहेत. पण आदल्या दिवशी बनवणाऱ्या जाणाऱ्या भोगीच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे अनेकांना माहित नाहीत. आज अनेकांच्या घरी भोगीची भाजी बनवली असेल. या भाजीचे काय आरोग्यदायी फायदे ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा खास बेत आणखा जातो. हिवाळ्यात मिळणाऱ्या घेवडा, हरभरा, बोरं, तुरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा या खास भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या भाजीमध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि खसखस असे उष्ण पदार्थांचा समावेश असल्याने हिवाळ्यासाठी आरोग्यदायी असते. 

काय आहेत आहेत फायदे?

> भोगीची भाजी हा समृद्ध आहार आहे, जो तुम्हाला संधिवात, हृदयरोग, स्ट्रोक, स्मृतिभ्रंश, कर्करोगापासून वाचवण्यास मदत करू शकतो आणि तुमच्या शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकतो.

> हे पोषक तत्त्वे प्रदान करते जे तुम्हाला तणावाशी जुळवून घेण्यास मदत करतात, जसे की बी जीवनसत्त्वे आणि फोलेट, ओमेगा -३ फॅट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ग्लूटाथिओन.

> पचन - हे गॅस आणि फुगणे कमी करण्यास देखील मदत करू शकते आणि तुमची पचनक्रिया निरोगी बनवते.

> भोगीची भाजी ही जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा एक चांगला स्रोत आहे, ती तुमच्या डोळ्यांना पोषक तत्वे पुरवते कारण ते व्हिटॅमिन ए चे एक प्रकार आहेत. मिश्र भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए चे अनेक कॅरोटीनोइड्स असतात जे दृष्टीसाठी आवश्यक असतात.

> हिरवे वाटाणे हे व्हिटॅमिन सीचे सर्वाधिक स्त्रोत आहेत, तर बीन्स आणि गाजर व्हिटॅमिन ई वाढवतात.

> बीन्समध्ये इतर भाज्यांपेक्षा किमान दुप्पट मॅंगनीज असते.खनिजांचा चांगला स्रोत, जो तुमची हाडे निरोगी ठेवण्यास आणि ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत करतो.

खाण्याची बेस्ट वेळ कोणती?

> दुपारच्या जेवणात तसेच रात्रीच्या जेवणासाठी भोगीची भजी खाणे चांगले.

 

WhatsApp channel

विभाग