मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : जावयाला सासरी एवढा मान का मिळतो?…

Joke of the day : जावयाला सासरी एवढा मान का मिळतो?…

HT Marathi Desk HT Marathi
May 01, 2023 09:29 AM IST

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

Viral Jokes
Viral Jokes

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

ट्रेंडिंग न्यूज

 

मेहुणी : दाजी,  भावोजी, एका प्रश्नाचं उत्तर द्याल का?

भावोजी : कोणता प्रश्न?

सासरच्या घरी जावयाला एवढा मान का मिळतो?

भावोजी : तो मान नसतो, उपकाराची परतफेड असते. 

डॉक्टरला भेटून आल्यावर तो बायकोला म्हणाला…

नवरा : डॉक्टरनं मला अळणी चहा प्यायला सांगितलाय

बायको : काही सांगू नका. मी दोन-दोन चहा बनवत बसणार नाही. 

अळणी चहा पाहिजे असेल तर आधी लाडू खा, मग चहा प्या. आपोआप अळणी लागेल.

नवऱ्यानं चहा पिणंच सोडून दिलं…

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel

विभाग