मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: 'या' चार प्रकारे वापरा बडीशेप, वेट लॉससोबत या आजारांमध्ये मिळेल आराम

Health Tips: 'या' चार प्रकारे वापरा बडीशेप, वेट लॉससोबत या आजारांमध्ये मिळेल आराम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 22, 2023 10:12 PM IST

Fennel Seeds Benefits: आजकाल वजन कमी करण्यासाठी बडीशेपचा खूप वापर केला जात आहे. पण यामुळे वजन कमी होण्याबरोबरच इतर आजारांमध्येही आराम मिळतो. या ४ प्रकारे तुम्ही ते खाऊ शकता.

बडीशेपचे फायदे
बडीशेपचे फायदे (unsplash)

Ways to Use Fennel Seeds: मसाल्यांमध्ये गोड आणि थंड वासासाठी बडीशेपला विशेष स्थान आहे. त्याची चव एकदम ताजे असते. ज्यामुळे याचा वापर नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. त्याचबरोबर आजकाल वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी पिण्याचा ही सल्ला दिला जातो. ज्यामुळे वजन तर कमी होतेच पण आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे होतात. बडीशेपमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे शरीराला अनेक आजारांपासून आराम देतात. ज्यामध्ये पचनापासून पीरियड्स क्रॅम्पपर्यंतचा समावेश आहे.

बडीशेप खाल्ल्याने या आजारांमध्ये मिळतो आराम

- चयापचय प्रणाली सुधारते

- यूरिनेशनची समस्या दूर होते

- उच्च रक्तदाब दूर होतो

- डोळ्यांचा कमकुवतपणा दूर होतो

- स्तनदा मातांच्या दूध उत्पादनास ही मदत होते.

- गॅस, ब्लॉटिंग दूर करण्यासोबतच बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया वेगवान होते.

- भूक वाढते.

- बडीशेपचे पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

या प्रकारे करा बडीशेपचा वापर

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी बडीशेपचा वापर करत असाल तर सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी प्या. शरीराच्या इतर आजारांवरही त्याचा परिणाम होतो. ते या मार्गांनी देखील घेतले जाऊ शकतात.

बडीशेप खा

रोजच्या रुटीनमध्ये बडीशेपचं पाणी प्यायला मिळत नसेल तर तुम्ही बडीशेप चावून खा. याची चव ताजी असून वजन कमी करण्यासही मदत होईल. तसेच, आयसाइट देखील मजबूत होईल.

बडीशेपचा चहा बनवा

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बडीशेप चहा बनवून पिऊ शकता. ते बनवण्यासाठी एक चमचा बडीशेप पाण्यात टाका. चवीनुसार थोडा गूळही घाला. हा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.

पावडर बनवून खा

जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर बडीशेप पावडर देखील खाऊ शकता. बडीशेप भाजून पावडर बनवा. या पावडरमध्ये काळे मीठ, खडी साखर आणि हिंग मिक्स करा. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग