मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Digestion Tips: स्वयंपाक करताना करा या मसाल्यांचा वापर, सहज पचणार संपूर्ण जेवण

Digestion Tips: स्वयंपाक करताना करा या मसाल्यांचा वापर, सहज पचणार संपूर्ण जेवण

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 20, 2023 08:33 PM IST

Health Care Tips: मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अपचन आणि छातीत जळजळ होते. पण असे काही मसाले आहेत जे अपचनाची समस्या दूर करून पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात.

पचनक्रिया सुधारण्यासाठी मसाले
पचनक्रिया सुधारण्यासाठी मसाले

Spices to Improve Digestion: स्वयंपाक ही एक कला आहे. भारतीय जेवणात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. ज्यामुळे जेवण चविष्ट तर होतेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदा होतो. मात्र, सर्व प्रकारचे मसाले वापरल्याने कधी कधी पचनक्रियेचेही नुकसान होते. म्हणूनच डॉक्टर जास्त मसालेदार पदार्थ खाण्यास नकार देतात. मसाल्यांशिवाय जेवण आवडत नसेल तर हे मसाले वापरा. यामुळे अन्न पचण्यास मदत तर होईलच, शिवाय आरोग्यही सुधारेल.

ट्रेंडिंग न्यूज

जिरे

जिऱ्याचा वापर फक्त तडका देण्यासाठी केला जात नाही तर त्याची चव आणि वास जेवणाला खास बनवतो. तसेच अन्न पचण्यास ही मदत होते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी खास भाजी बनवत असाल तेव्हा मसाल्यात जिरे पावडरचा समावेश नक्की करा.

ओवा

ओवा पोटासाठी खूप फायदेशीर आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी वजन नियंत्रणात ओव्याचा वापर केला जातो. जर तुम्ही मीट बनवत असाल तर ओव्याचा वापर नक्की करा. यामुळे हे सर्व मसाले आणि मांस पचण्यास मदत होईल.

हिंग

वरणापासून भाजीपर्यंत अनेकांना हिंग फोडणी आवडते. हिंग पोटदुखी, गॅस, अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही किचनमध्ये उडीद किंवा मूग डाळ बनवत असाल, तेव्हा त्याला हिंगाचा तडका द्यायला विसरू नका.

वेलची

लोकांना माउथ फ्रेशनर म्हणून वेलची खायला आवडते. दुधापासून बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये वेलचीची चव अप्रतिम असते. मसाला म्हणून तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकता. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

बडीशेप

बडीशेप तडका कलोंजी सारख्या पदार्थातही रुचकर लागतो. हा मसाला चवीसोबतच पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जेवणानंतर बडीशेपच्या पाण्याच्या मदतीने पचन सुधारू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग